Biggest Box Office Hit Of 2025: 2025 चं अख्खं वर्ष भारतीय सिनेसृष्टीसाठी (Indian Film Industry) खूपच खास ठरलं. या वर्षात अनेक हिट सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) येऊन आदळले. कित्येक मोठ्या बजेटच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. 'धुरंधर' (Dhurandhar), 'छावा' (Chhaava), 'सैय्यारा' (Saiyaara), 'एक दिवाने की दिवानियत' (Ek Deewane ki Deewaniyat) आणि 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara: A Legend Chapter-1) सारख्या सिनेमांनी प्रचंड नफा कमवला. पण त्या सर्वांमध्ये, एक चित्रपट असा आहे, ज्यानं त्याहूनही जास्त कमाई केली. तो फक्त 50 लाखांचं बजेट असलेला गुजराती चित्रपट आहे, तरीही तो 'धुरंधर' आणि 'छावा' सारख्या भल्यामोठ्या सिनेमांसमोर तग धरुन बसला. 2025 च्या अख्ख्या वर्षात बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या सिनेमाचा मान या सिनेमाला मिळालाय.
2025 मधील सर्वात मोठे बॉक्स ऑफिस हिट
'लाल कृष्ण सदा सहायते' हा एक गुजराती चित्रपट आहे. हा एक भक्तीपर चित्रपट आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, हा चित्रपट फक्त 50 लाख बजेट असलेला होता आणि त्यात कोणताही मोठा स्टार नव्हता. तरीही, तो सर्वाधिक कमाई करणारा गुजराती चित्रपट ठरला. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पहिला गुजराती चित्रपट होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 120 कोटी रुपये कमावले आणि 24,000 टक्के नफा मिळवला.
'या' सिनेमांनाही टाकलं मागे
'लाल कृष्ण सदा सहायते' या गुजराती सिनेमानं 'सीक्रेट सुपरस्टार', 'जय संतोषी माँ'सारख्या सिनेमांना पछाडलं आहे. 'सीक्रेट सुपरस्टार' सिनेमानं तर 6 हजार टक्क्यांचा प्रॉफिट कमावलेला. 'सीक्रेट सुपरस्टार' 15 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेली आणि सिनेमानं तब्बल 900 कोटींचं कलेक्शन केलेलं. 'लाल कृष्ण सदा सहायते' सिनेमानं 24000 टक्क्यांचा प्रॉफिट कमावला असून एक बेंचमार्क सेट केला आहे.
या वर्षीच्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये 'कांतारा चॅप्टर 1', 'धुरंधर', 'सैयारा' आणि 'छावा' यांचा समावेश आहे. 'कांतारा चॅप्टर 1'नं 680 टक्के नफा कमावला, तर 'धुरंधर'नं 760 टक्के नफा कमावला आणि अजूनही कमाई करतोय. 'छावा' सिनेमानं 373 टक्के नफा कमावला.
'लाल कृष्ण सदा सहायते'बद्दल बोलायचं झालं तर, हा सिनेमा कृषांश वाजा (Krushansh Vaja), विकी पूर्णिमा आणि अंकित सखिया (Ankit Sakhiya) यांनी लिहिला आहे. अंकित सखियानं चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. ही कथा एका रिक्षाचालकाभोवती फिरते, जो एका फार्महाऊसमध्ये अडकतो. या काळात तो भूतकाळातील वाईट कृत्यांचा सामना करतो आणि भगवान कृष्णाचं दर्शन घेतो. या चित्रपटात रिवा राच, करण जोशी आणि श्रुहद गोस्वामी यांच्या भूमिका आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :