Feather Challenge : सध्या बॉलिवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor-Khan) त्यांच्या बहुप्रतिक्षित 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. 'लाल सिंग चड्ढा'च्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर 'फेदर चॅलेंज' सुरू झाले आहे. चित्रपटाची अभिनेत्री करीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आमिरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही 'फेदर चॅलेंज' करताना दिसत आहेत.
व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर-खानने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘फेदर चॅलेंज माझ्या आवडत्या हिरोसोबत’. हा व्हिडीओ शेअर करत तिने आमिर खान, दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनाही टॅग केले. 'लाल सिंग चड्ढा'च्या निर्मात्यांनी हे फेदर चॅलेंज लाँच केले होते. यामध्ये चॅलेंज म्हणून ठराविक वेळेत पंखावर फुंकर घालून ते उडवून, गुण मिळवावे लागतात.
पाहा व्हिडीओ :
नुकतेच आमिरने या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले होते. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूर ही जोडी दिसणार आहे. करीना आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी दोघांनी '3 इडियट्स'मध्ये एकत्र काम केले आहे.
या चित्रपटात मोना सिंह आणि दक्षिणेतील अभिनेता चैतन्य अक्किनेनी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट एरिक रॉथच्या 1994च्या हॉलिवूड हिट 'फॉरेस्ट गंप'च्या मूळ पटकथेची भारतीय आवृत्ती आहे. चित्रपटाची कथा अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून, दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. त्यांनी याआधी आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’चे दिग्दर्शनही केले आहे.
हेही वाचा :