स्टार प्लस वाहिनी त्यांच्या आजतागायत सर्वात लोकप्रिय मालिका ठरलेल्या 'क्यूँकी सास भी कभी बहू थी बॅक' च्या नव्या सीझनसाठी सज्ज झाली आहे. या बातमीनेच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. ही मालिका प्रदर्शित होण्यास सज्ज होत असताना, नवीन सीझनमधील तुलसीचा एक लीक झालेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या मालिकेचे प्रमुख पात्र असलेल्या तुलसी विराणीची पहिली झलक पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

Continues below advertisement


या फोटोमध्ये, सोनेरी जरीची बॉर्डर असलेली मरून रंगाची साडी परिधान केलेल्या तुलसी विराणीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी यांच्या व्यक्तिमत्त्वात तीच सुंदरता आणि आभा व्यापलेली दिसून येते. एक साधे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, मोजके साधेसे दागिने आणि त्यांची खासियत असलेली मोठी लाल बिंदी अशी तुलसी या व्यक्तिरेखेची ताकद आणि सुंदरतेचे प्रतीक असलेला पेहराव त्यांनी परिधान केलेला आहे. त्यांचे केस व्यवस्थित बांधलेले आहेत. त्यांच्या या पहिल्या लूकने प्रेक्षकांच्या या मालिकेविषयीच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना दूरचित्रवाणी वाहिनींच्या सुवर्णकाळात घेऊन जातात. यामुळे तमाम प्रेक्षकांचे तुलसी विराणी या प्रतिष्ठित पात्राशी असलेले त्यांचे भावनिक नाते पुन्हा जागे झाले आहे.


‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका म्हणजे भारतीय दूरचित्रवाणी वाहिनींच्या जगातील एक महान वारसा आहे. 2000 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला केवळ ‘प्राइम टाइम’ मध्येच स्थान मिळाले नसून  लाखो भारतीयांच्या घरात आणि त्यांच्या हृदयातही कायमचे स्थान निर्माण केले आहे. ही मालिका पिढ्या-पिढ्यांमध्ये प्रतिध्वनित झालेली भावना बनली आहे. एक अशी मालिका जी घरातल्या सर्वांना एकत्र आणणारा एक कौटुंबिक संस्कार बनली, ज्यामुळे तुलसी आणि मिहिर विराणी भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्यांमधील संस्मरणीय पात्र बनले.


या मालिकेचा नवा सीझन लवकरच प्रदर्शित होणार असून निर्माते लवकरच या बहुप्रतिक्षित मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतील.