Kunika Sadanand On NEET UG 2026: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर (NEET) फुटीप्रकरणाचा सध्या सीबीआय तपास (NEET Paper Leak Case CBI Investigation) सुरू आहे. या प्रकरणात सध्या अनेक धक्कादायक खुलासे होत असून आता विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. 3 मे रोजी नियोजित करण्यात आलेली NEET UG 2026 ही परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली. 'फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन' (FAIMA) नं या संदर्भात न्यायालयात एक याचिका दाखल केली असून, त्याद्वारे परीक्षा प्रक्रियेबाबत (NEET Examination Process) गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि अनेक महत्त्वपूर्ण सुधारणांची मागणी केली आहे.
NEET सारख्या राष्ट्रीय स्तरांवरील परीक्षांच्या विश्वासार्हतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी, तसेच भविष्यात या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, या परिस्थितीचं वर्णन त्यांच्या मनोधैर्याला बसलेला एक जबरदस्त धक्का आहे. असं असतानाच कुनिका सदानंद हिनं या मुद्द्यावर आपलं मत ट्वीटद्वारे मांडलं आहे.
अभिनेत्री कुनिका सदानंद काय म्हणाल्या? (Actress Kunika Sadanand On NEET Paper Leak Case)
NEET पेपरफुटी आणि त्यानंतर परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झालंय. अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी या परिस्थितीबाबत एक उपहासात्मक टिप्पणी पोस्ट केली आहे. त्याच पोस्टमध्ये त्यांनी आणखी एक मेसेजही जोडला आहे. "Google वर माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल शोधणं थांबवा...", असं कुनिका सदानंद म्हणाल्या आहेत.
"प्रश्न विचारणार? की आताही अंध-भक्त बनून राहणार?"
बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. अभिनेत्री सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करत असते. नीट पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्यानं कोटा येथील विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. अभिनेत्री कुनिकानं याबद्दल एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री कुनिका सदानंद यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "कसे आहात मित्रांनो? NEET परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे, आता तरी तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात कराल? की तसेच अंध-भक्त बनून राहाल? माझ्या आयुष्याबद्दल गुगल करणं थांबवा... त्याऐवजी, मागील पेपरफुटीमागील गुन्हेगार सध्या कुठे आहेत आणि कोणत्या 'मलाई पोस्टिंग'चा सध्या उपभोग घेत आहेत, याचा शोध घ्या..."
कुनिका यांच्या पोस्टवर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया
कनिका सदानंद यांच्या पोस्टवर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "तिनं तिचा स्वतःचा फोटो का पोस्ट केलाय?" तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "भक्तांचा' राग कधीच शांत होत नाही. आता एक महान योद्धा अवतरली आहे, जी त्यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज आहे. कुनिकाजी, प्रश्न विचारणे सुरूच ठेवा; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत."
NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे (NEET Paper Leak Case Handed Over to CBI)
विशेष म्हणजे, NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला आहे. तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं जाईल आणि सर्व संबंधित रेकॉर्ड्स उपलब्ध करून दिले जातील, असं NTA नं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. NEET UG परीक्षेला अंदाजे 23 लाख विद्यार्थी बसले होते. प्रत्यक्षात, 3 मे रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्यात आली असून, या परीक्षेचं पुनर्आयोजन केलं जाईल. या पुनर्परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच अधिकृतपणे जाहीर केल्या जातील.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
