TV Actress Sanchita Ugale End Life: टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून (Television Industry) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री (TV Actress) संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं आपलं आयुष्य संपवलं आहे. अवघ्या 30व्या वर्षी संचितानं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे अख्खं मनोरंजनविश्व हादरलं आहे.
अभिनेत्री संचिता उगले मुंबईतील नालासोपाला परिसरात अचोले पोलीस स्थानकाच्या परिसरात राहते. संचितानं रविवारी, संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास संचितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय. तर, अभिनेत्री संचिता उगाले हिच्या अशा जाण्यानं अवघी इंडस्ट्री हादरली आहे.
साडीनं गळफास घेत संपवलं आयुष्य (Sanchita Ugale End Life)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
विक्की कौशलच्या 'छावा' सिनेमातंही केलंय काम (Sanchita Ugale In Chhaava Movie)
अभिनेत्री संचिता उगले हिनं टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलंय. 'कुमकुम भाग्य' आणि 'वागले की दुनिया' यांसारख्या प्रसिद्ध शोमधून संचितानं आपली वेगळी ओळख निर्माण केली. तसेच, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' शोमध्येही तिनं काम केलेलं. टेलिव्हिजन सीरिअल्सव्यतिरिक्त संचिता फिल्म्समध्येही दिसलेली. तर, विक्की कौशल स्टार फिल्म 'छावा'चा हिस्सा होती. ज्यामध्ये तिनं ताराबाई ही भूमिका साकारलेली.
'कुमकुम भाग्य' मालिकेत संचिता उगले हिनं दिया टंडन ही भूमिका साकारलेली. 'दिलवाले दुल्हे ले जायेगी...' या मालिकेत तिनं सुकून ही मुख्य भूमिका साकारलेली. 'वागले की दुनिया' मालिकेत तिनं रुचिता जैतली ही भूमिका साकारलेली. छावा सिनेमात तिनं महाराणी ताराराणींची तिनं भूमिका साकारलेली. सायलेन्स 2 सिनेमातही तिनं महत्त्वाची भूमिका साकारलेली.
पोलिसांचं म्हणणं काय? (Sanchita Ugale Ends Life)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री संचिता उगाले आपले आई-वडील आणि बहिणीसोबत नालासोपाऱ्यातील परिसरात राहत होती. घरी एकटी असतानाच संचितानं टोकाचं पाऊल उचललं. संचितानं राहत्या घरात साडीनं गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. घटनास्थळी सुसाईड नोट सापडली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून सध्या पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
संचिता उगलेचा 'तो' शेवटचा VIDEO (Sanchita Ugale Last Video)
संचिता उगलेच्या मृत्यूनंतर तिची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे. मृत्यूच्या 19 तासांपूर्वी अभिनेत्रीनं इन्स्टावर एक पोस्ट केलेली. यामध्ये ती हसत-खेळत रिल करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून कोणी विचारही केला नसेल की, पुढच्या काही तासांतच संचिता आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार आहे. व्हिडीओमध्ये संचिता कॅमेरा हातात धरून दिसतेय. आपल्या शेवटच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये संचितानं लिहिलंय की, "मैं नाचूं तू नचा..." संचिताचे इन्स्टावर 139K फॉलोअर्स होते.
"तिच्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता..." (Sanchita Ugale Grandfather Reaction)
संचिता उगले (Sanchita Ugale) हिच्या आजोबांनी माध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "संचिता अतिशय हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिनं स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलेलं. तिच्या पाठीशी कोणीही गॉडफादर नव्हता. कामाचीही तिला कमतरता नव्हती आणि तिच्या आयुष्यात कोणताही मोठा वाद असल्याचं आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे तिनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? हे आम्हालाही समजत नाही..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
