Kubbra Sait On Abortion: 'बिग बॉस'ला (Bigg Boss) टक्कर देणारा अश्नीर ग्रोवरचा (Ashneer Grover) रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल'चा (Rise and Fall) नुकताच फिनाले पार पडला. या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलिकडेच तिनं तिच्या आयुष्यातील एका धक्कादायक वळणाबाब खुलासा केलेला. कुब्रा सैतनं वयाच्या तिसाव्या वर्षी गर्भपात केलेला.  ज्यावेळी तिनं हा निर्णय घेतला, त्यावेळी हा निर्णय बरोबर आहे की, चूक याची कल्पना नव्हती. दरम्यान, ती पुढे म्हणाली की, "आज मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की,  मी त्यावेळी घेतलेला निर्णय योग्य होता..." कुब्रा सैतचं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

विरल भयानीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या द्विधा मनस्थितीबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, "त्या घटनेला अनेक वर्षे झाली आहेत आणि मला त्याबद्दल विचार करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ मिळाला. मात्र, तुमच्या आयुष्यात असा क्षण येतो, जेव्हा तुम्ही एका द्विधा मनस्थितीत सापडता, कारण तुमचा विश्वास, तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमच्या सभोवतालचं जगही तिथं असतं. तुम्हाला तुमची कर्तव्ये काय आहेत हे माहीत असतं, तुम्हाला माहिती असतं की, समाज तुमच्याकडे कोणत्या नजरेनं पाहतोय.त्यामुळे तुम्हाला चूक आणि बरोबर काय असतं यांच्यात अडकल्यासारखं वाटतं..." 

"त्यावेळी तुमचा निर्णय योग्य आहे की नाही हे तुम्हाला माहित नसतं. पण आज, मी आत्मविश्वासाने म्हणू शकते की मी त्यावेळी घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्य होता. कारण मला माहित आहे की जरी मी चूक केली असती तरी देव सगळं बघतोय आणि मला त्याचे परिणाम भोगावे लागले असते." असं म्हणत अभिनेत्रीनं तिच्या मनातील भावनांना मोकळीक करुन दिली.

भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड... (Kubbra Sait On Abortion)

याआधीही कुब्राने खुलासा केला होता की या घटनेतून बाहेर पडण्यासाठी बराच काळ लागला. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान, तिला अनेकदा अस्वस्थ वाटायचे, खूप रक्तस्त्राव व्हायचा आणि चिडचिड व्हायची, परंतु तिने याबद्दल कोणासोबतही चर्चा केली नाही. असंही अभिनेत्रीने सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Beauty Queen Of Indian Cinema: इंडस्ट्रीची अप्सरा होती 'ही' सुंदर अभिनेत्री; स्वतःच्याच बंगल्यात झालेली हत्या, बदला घेण्यासाठी ड्रायव्हरनंच घरात घुसून केलेले 17 वार