Kritika Kamra Gaurav Kapur: अभिनेत्री कृतिका कामराने (Kritika Kamra) अलीकडेच क्रिकेट होस्ट आणि कंटेंट प्रोड्युसर गौरव कपूरसोबतच्या (Gaurav Kapur) आपल्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृतपणे दुजोरा दिला. तिने गौरवसोबतच्या ब्रेकफास्ट डेटचे काही फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाले. आता, रिलेशनशिप कन्फर्म केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच कृतिकाला तिच्या बॉयफ्रेंड गौरवसोबत पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी पाहण्यात आले. हे कपल एका फिल्म स्क्रीनिंगला एकत्र पोहोचले होते. 

Continues below advertisement

Kritika Kamra Gaurav Kapur: बॉयफ्रेंड गौरव कपूरसोबत स्पॉट झाली कृतिका

कृतिका कामरा आणि गौरव कपूर हे मुंबईतील एका फिल्म स्क्रीनिंगला एकत्र दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे कपल पॅप्ससाठी पोझ देताना दिसत आहे. आउटफिटबद्दल बोलायचं झालं तर, कृतिकाने स्टायलिश ब्लॅक टॉप आणि कम्फर्टेबल ग्रे बॅगी जीन्स परिधान केली होती, ज्यात ती खूपच आकर्षक आणि फॅशनेबल दिसत होती. तर गौरवने ब्लू स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्समध्ये कॅज्युअल पण तितकाच स्टायलिश लुक कॅरी केला होता. या दोघांची स्टाइल आणि त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून फॅन्स अक्षरशः फिदा झाले. एका नेटिजनने कमेंट केली, “खूप गोड जोडी,” तर अनेकांनी रेड हार्ट इमोजी पाठवून या कपलवर प्रेमाचा वर्षाव केला.

Kritika Kamra Gaurav Kapur: 10 डिसेंबरला कृतिकाने गौरवसोबतचे नाते केले होते कन्फर्म

10 डिसेंबर रोजी कृतिका कामराने गौरव कपूरसोबतच्या ब्रेकफास्ट डेटचे काही फोटो शेअर केले होते. यामुळे सोशल मीडियावर महिन्यांपासून सुरू असलेल्या त्यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चांना अखेर शिक्कामोर्तब झाले. कृतिकाने कॅप्शनमध्ये लिहिले होते “ब्रेकफास्ट विथ…” ज्यातून गौरव कपूरच्या प्रसिद्ध शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’कडे सूचक इशारा होता. भारतातील नामांकित खेळाडूंसोबत सखोल आणि मोकळ्या गप्पांसाठी प्रसिद्ध हा लाँग-फॉर्मेट शो गौरवला क्रिकेट जगतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये गणला जातो.

कृतिकाने फोटो शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अभिनेता नकुल मेहताने “सॉफ्ट लॉन्च 101” अशी मजेशीर कमेंट केली, तर श्रेया धनवंतरीने, “बब्बीज!!!” अशी कमेंट केली होती. अनूप सोनी, दृष्टि धामी आणि इतर कलाकारांनी देखील या जोडीला शुभेच्छा दिल्या होत्या.

Gaurav Kapur: गौरव कपूरचा किरत भट्टलसोबत झालाय घटस्फोट 

गौरव कपूरचे यापूर्वी अभिनेत्री किरत भट्टलशी लग्न झाले होते. बॉलिवूड शादीजच्या अहवालानुसार, गौरव आणि किरत यांची पहिली भेट 2012 मध्ये झाली होती. काही वर्षे डेट केल्यानंतर या दोघांनी 2014 मध्ये विवाह केला. मात्र 2021 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विभक्त होण्यामागील कारणांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Kritika Kamra: कृतिका कामराचे करिअर

टेलिव्हिजनमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या कृतिका कामराने तांडव आणि कौन बनेगी शिखरवती यांसारख्या ओटीटी मालिकांमध्ये काम केले आहे. वह हश हश, बंबई मेरी जान, ग्यारह ग्यारह, सारे जहां से अच्छा अशा वेबसीरिजमध्ये देखील तिने काम केले आहे.  कृतिका 2018 मधील मित्रों आणि 2023 मधील भीड़ या चित्रपटांमध्येही झळकली आहे.

आणखी वाचा 

Kranti Redkar: कठीण काळात इंडस्ट्री पाठ फिरवून उभी होती, अनेकांकडून फक्त वरवरची चौकशी; पण 5 जणांनी दिली खरी साथ! क्रांती रेडकर पहिल्यांदाच 'त्या' दिवसांबद्दल बोलली