Kranti Redkar: मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शिका आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. 'मैत्रेया' (Maitreya) असे तिच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन क्रांती रेडकर वानखेडे हिनं केलं आहे. या सिनेमात मैत्री आणि प्रेमाच्या मधल्या गुंतागुंतीच्या नात्यांवर आधारित सुंदर गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँच कार्यक्रमात IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या जुळ्या मुलींसोबत उपस्थित होते. नुकतंच क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध किस्से शेअर केले. यावेळी क्रांती रेडकरनं एक अनुभव सांगितला. 'हिंदी सिनेसृष्टीत मला कामं नाही देत', असं क्रांती रेडकर म्हणाली.
क्रांती रेडकरला हिंदी सिनेसृष्टीने नाकारलं असल्याचं समोर आलं (Kranti Redkar Claims She is not getting work in hindi industry)
समीर वानखेडेंच्या कामाच्या पद्धतीचा क्रांती रेडकरच्या करिअरवर कधी परिणाम झाला आहे का? असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. क्रांती रेडकर म्हणाली की, 'हो, हिंदी सिनेसृष्टीत मला नाही देत कामं. डायरेक्टर असो किंवा लेखक म्हणून, तिथल्या स्टुडिओंना माझ्यासोबत काम करायचे नाही, या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. प्रसिद्ध हिंदी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला माझ्यासोबत काम करायचं होतं. तिने बऱ्याच स्टुडिओमध्ये माझ्याबद्दल माहिती दिली'.
'मला समोरुन क्लिअरली येत होतं की, आम्हाला त्या प्रोजेक्टचा भाग नाही व्हायचं, जिथे समीर वानखेडे यांचं नाव असेल. त्यामुळे हिंदी सिनेसृष्टीत नसलं तरी, मराठी सिनेसृष्टीत माझी माणसं आहेत. मराठी सिनेसृष्टीत मला सपोर्ट करणारी लोक आहेत. मराठीतल्या कुठल्याही चॅनेल्सना या गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. मला कौतुक आहे, माझ्या पाठीमागे ज्या पद्धतीने मराठी प्रेक्षक, कलाकार उभे राहतात, मला खरंच त्याचं कौतुक आहे', असं क्रांती रेडकर म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
