Ankita Walawalkar New House in Panvel: आपल्या हक्काचं स्वप्नातलं घर असावं, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकजण पै पै साठवून आपसं स्वप्न पूर्ण करतात. सर्वसामान्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं मुंबईत (Mumbai News) हक्काचं घर (New Home) घेण्याचं स्वप्न असतं. अनेकांनी ते स्वप्न पूर्णही केलंय. अशातच आता गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) मुहूर्तावर एका सेलिब्रिटी कपलनं आपल्या स्वप्नातलं घर घेतलं आहे. 

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरनं (Ankita Walawalkar) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन गुडन्यूज दिली आहे. अंकिता वालावलकर आणि तिचा पती संगीतकार कुणाल भगत (Kunal Bhagat) यांनी आपल्या हक्काचं घर घेतलं आहे. सोशल मीडियावर घराचे फोटो शेअर करुन अंकिता आणि कुणालनं ही गूड न्यूज चाहत्यांना दिली आहे. पण, त्याहीपेक्षा अंकितानं लिहिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर नेमकं काय म्हणाली? (Ankita Walawalkar Buy New House)

अंकिता वालावलकरनं पोस्ट शेअर करताना एक कॅप्शन लिहिलंय, ती म्हणालीय की, "घर घेणं… हे फक्त स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते…पण मनात एकच विचार “माझं घर कधी?”मी कुठेतरी वाचलं होतं स्वप्नं नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची.कारण लायकी आपण वाढवू शकतो…"

"पण छोटं स्वप्न मोठं होत नाही.मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल.मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे.अंबानींच्या antilia समोर उभी राहायचे.त्या उंच इमारतीकडे बघायचे,आणि स्टोरी टाकायचे "एक दिन मेरा भी घर होगा.”लोकांसाठी ती फक्त एक स्टोरी होती… पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती. विश्वाला केलेली एक शांत हाक होती.आज विचार केला तर अंगावर शहारे येतात. आणि योगायोग बघा आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे, त्या टॉवरचं नाव आहे "Antilia" हा योगायोग आहे? की स्वामींची इच्छा?", असं अंकिता वालावलकर म्हणाली आहे.  

पुढे बोलताना अंकिता वालावलकर म्हणाली आहे की, "मी जिथे नोकरी करायचे तिथले आमचे काँट्रॅक्टर पटेल गुजरातीमध्ये म्हणायचे, "Rotla male easy chhe, pan Mumbai ma ghar male mushkil chhe..." रोटी कमवणं सोपं आहे… पण मुंबईत स्वतःचं घर? खूप अवघड. त्या वाक्याने पण मी कधी घाबरले नाही… उलट ठरवलं होतं...  एक दिवस मीच माझ्या घराच्या चाव्या हातात घेणार!"

"लग्नानंतर हे "माझं" स्वप्न "आमचं" झालं. कारण आता घर फक्त चार भिंती नव्हत्या,ते आमचं future होतं… आमची सुरक्षितता होती.वर्षभर आम्ही घरांच्या शोधात भटकलो.प्रत्येक घरात गेलो पण मन म्हणायचं "नाही… अजून नाही." एक वेळ अशी आली की, स्वप्न थोडंसं शांत झालं. "कदाचित अजून वेळ आहे", असं आम्ही स्वतःलाच समजावलं.आणि मग…अचानक हे घर समोर आलं.दरवाजा उघडला…आणि मन म्हणालं "हेच!"", असं अंकिता वालावलकर म्हणाली.  

"पण आकडेमोड तयार नव्हती.मन धजावत नव्हतं.भविष्याचं ओझं जड वाटत होतं.मी कुणालचा हात पकडला…आणि हसत म्हटलं “उडी मारली की पोहायला येतंच.”त्यादिवशी रात्रभर आम्हाला झोप लागली नाही ,खूप भीती वाटत होती…कुणाल ला तर खूप जास्त भीती वाटत होती…पण मला स्वप्नावर विश्वास होता.आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला भीतीपेक्षा मोठं आपलं स्वप्न आहे. Risk घ्यायची हिंमत असेल,तरच मोठं स्वप्न पूर्ण होतं. आज या चाव्या हातात आहेत… आणि मनात एकच भावना", असं अंकिता वालावलकर म्हणाली आहे.  

"या पृथ्वीवर आमची स्वतःची एक जागा आहे.छोटी असेल… पण आमची आहे.आणि ती आम्ही दोघांनी उभी केली आहे.अभिमान पैशांचा नाही.अभिमान आहे त्या प्रवासाचा.जर तुम्हीही घराचं स्वप्न पाहत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल…पण जिद्द जिवंत ठेवा. कारण घर जिद्दीने बांधलं जातं… त्या दिवशी मी Antilia कडे बघत होते… आज माझ्या Antilia मध्ये उभी आहे...", असं अंकिता वालावलकर म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिद्धार्थ चांदेकर अन् मितालीने चाहत्यांना दिली गुड न्यूज! मुंबईत हक्काचे दुसरं घर घेत केला गृहप्रवेश