Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: 'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati) हा मराठी क्विझ शो (Marathi Quiz Show) लवकरच पुन्हा टेलिव्हिजनवर (Television Show) येण्यासाठी सज्ज झालाय. मात्र या शोच सूत्रसंचालन कोण करणार? याची उत्सुकता सर्वांना लागलीय. नव्या सीझनची उत्सुकता चाहत्यांना लागली असून साधारणतः आठवड्याभरापूर्वी या शोचा प्रोमो (Kon Honaar Crorepati Promo) लॉन्च करण्यात आला. पण, यंदा शो कोण होस्ट करणार? हे मात्र, गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं. यापूर्वी मराठी अभिनेते (Marathi Actor) सचिन खेडेकर (Sachin Khedekar), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे (Director Nagraj Manjule) यांनी या शोची सूत्रसंचलनाची जबाबदारी सांभाळली होती. पण, यंदाच्या सीझनमध्ये प्रसिद्ध शो कोण होस्ट करणार? हे मात्र, गुदस्त्यात ठेवण्यात आलेलं. प्रोमोमध्येही हा प्रश्न अनुत्तरीतच ठेवण्यात आलेला. अशातच आता यंदाच्या पर्वाचा होस्ट कोण असणार? याचं उत्तर सर्वांना मिळालंय.
'कोण होणार करोडपती' (Kon Honaar Crorepati Show) कार्यक्रमाचा यंदाचा आधी ज्यांनी होस्टिंग केलंय, त्यांच्यापैकी एक नसून वेगळा असणार आहे. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेल्या सेलिब्रिटी पाहुण्यांना या होस्टचा चेहरा पाहून सुखद धक्का बसला आहे.
नुकत्याच पार पडलेलेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यातून याचं उत्तर मिळतंय. कारण मराठी कलाकरांना होस्टचं नाव दाखवण्यात आलं. नव्या होस्टचं नाव ऐकून मराठी कलाकारांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसून आला. मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनाही हे नाव ऐकून मोठा धक्का बसला.
माधुरी दीक्षित 'कोण होणार करोडपती'ची होस्ट? (Madhuri Dixit to host Kon Honar Crorepati?)
'कोण होणार करोडपती'च्या यंदाच्या पर्वाची होस्ट चाहत्यांची लाडकी 'धकधक गर्ल', माधुरी दीक्षित असणार आहे, अशा चर्चा सुरू झाल्यात. माधुरी दीक्षित कोण होणार करोडपतीचं सूत्र संचलन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय, अजून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच होस्टच्या अधिकृत नावाची घोषणा केली जाणार असल्याचं बोललं जातंय.
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात काय घडलं?
नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अमृता फडणवीस, रेणुका शहाणे, अभिजीत सावंत, वैभव तत्त्ववादी, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर यांसारख्या मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांची मांदियाळी उपस्थित होती. फिल्मफेअर सोहळ्याच्या निमित्तानं 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची आणि होस्टची पहिली झलक पाहुण्यांना दाखवण्यात आली. नव्या होस्टचं नाव समजल्यावर सगळ्याच सेलिब्रिटींना सुखद धक्का बसला. रेणुका शहाणेंचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला. अमृता फडणवीस, भरत जाधव यांच्या प्रतिक्रिया पाहून 'कोण होणार करोडपती'ची नवी होस्ट दुसरी तिसरी कोणीही नसून 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
