Kon Banega Karodpati Harsh Gujral: 'कौन बनेगा करोडपती ' सीजन 17 सेटवर दर आठवड्याला काही भन्नाट पाहुणे येत असतात. काही दिवसांपूर्वी सुनील ग्रोवर ने धमाल उडवल्यानंतर आता कॉमेडियन हर्ष  गुज्रालने(Harsh Gujral) केबीसीच्या सेटवर धमाल 'रॅपिड फायर रोस्ट ' केला . तो एवढा कमाल होता की बिग बिन नाही हसू आवरलं नाही .बागबान या 2003 मधील सुपरहिट चित्रपटाचा उल्लेख करत हर्षने संपूर्ण जनरेशनच्या मनातल्या विनोदांना स्पर्श केला . 90 आणि 2000 च्या दशकातील मुलांसाठी बागबान हा चित्रपट म्हणजे पालकांकडून दाखवला जाणारा 'भावनिक अस्त्र ' असल्याचं त्यानं खुलेपणाने सांगितलं . त्यांना बिग बिना थेट प्रश्न केला की 'सर तुम्ही ती फिल्म का केली ? भारतात मुलांना फक्त दोन गोष्टींची भीती वाटते - रात्री वीराना आणि सकाळी बागबान ! ' असं तो म्हणाला . त्यावेळी सर्वच जण हसून लोटपोट झाले .

Continues below advertisement

तुमचे चारही पोरं वाया गेले ..

केबीसीच्या अलीकडच्याच एका भागात कॉमेडियन हर्ष गुज्राल आला होता .त्याच्या स्टॅन्ड अप सेगमेंट दरम्यान हर्षने बागबान सिनेमाला घेऊन केलेल्या मजेदार सेटमुळे केबीसीच्या सेटवर हशा पिकला होता . हर्षने दिलखुलासपणे केलेल्या कॉमेडीवर बिग बी अमिताभ बच्चन यांनाही हसू आवरलं नाही .हर्षने थेट अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहत विचारलं ' सर तुम्ही बागबान सिनेमा का केला ?भारतातील मुलांना फक्त दोन गोष्टींची भीती वाटते .रात्री वीराना आणि सकाळी बागबान ! यावेळी सगळेच जण खळखळून हसत होते .हर्षने पुढे सांगितलं त्या सिनेमातील तुमचे चारही मुलं वाया गेलेले आहेत .आम्ही काय पाप केलं ! आम्हाला अनेक वर्षांपासून याचा त्रास सहन करावा लागत आहे . आमच्या घरचे सिनेमा पाहून म्हणायचे की तुमची नजर फक्त प्रॉपर्टीवर आहे .. त्यांना शेवटी म्हणावं लागायचं की आपण भाड्याने राहतो ..

 

Continues below advertisement

आम्हाला चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जात असताना आमचे पालक बदडायचे .आम्हाला वाटायचं की त्यांनी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही तरीही ते आपल्याला इतके मारताहेत .जर यांनी चित्रपट पाहिला तर आपल्याला मारूनच टाकतील .बागबान चित्रपटाने आमच्या वयातील मुलांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं हर्ष सांगतो .त्यावेळी अमिताभ बच्चन यांनाही हसू आवरत नाही .

करवा चौथच्या सीनवरही कॉमेडी

हर्षने अमिताभ बच्चन यांच्या बागबान चित्रपटातील करवा चौथ उपवासाच्या दृश्यावरही बिग बींना रोस्ट केलं . तुम्हाला या चित्रपटातील करवा चौथच्या सीन मुळे भारतीय कुटुंबांमधील नातेसंबंधांच्या अपेक्षा कायमचा बदलल्या .तुम्ही चित्रपटात करवा चौथं चा उपवास का केला ? आता देशातील सर्व पुरुष तणावाखाली आहेत .हर्ष गुजरात याने प्रेक्षकांना सांगितले की अमिताभ यांनी कॅमेरा चालू होईपर्यंतच उपवास केला होता आणि कट नंतर त्यांनी फळे खाण्यास सुरुवात केली " हर्षचा गमतीदार बोलण्यामुळे प्रेक्षक खळखळून हसत होते .