Kolhapur RJ Sumit Dialysis and ICU Recovery Experience: आपल्या रांगड्या भाषेतून प्रेक्षकांना आपलंस करणारा कोल्हापूरचा आरजे सुमित (RJ Sumit) सध्या आरोग्याच्या संकटाला सामोरे जात आहे. त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या. किडनी निकामी झाल्यामुळे त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाली होती. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. योग्य उपचार आणि जिद्दीच्या जोरावर आरजी सुमित संकटातून बाहेर आला आहे. दरम्यान, या संकटातून आरजे सुमित नेमका बाहेर आला कसा? याची माहिती त्यानं मुलाखतीतून दिली.
आरपारला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत आरजे सुमितने आपल्या आजारपणाबद्दल खुलासा केला. 'या कठीण प्रसंगी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. किंवा ह्रदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. याहून भयंकर म्हणजे पेशंट कोमातही जाण्याची शक्यता आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला होता. ब्लडप्रेशर अजिबात नियंत्रणात नव्हते. मानवी शरीराचे ब्लडप्रेशर साधारणपणे 110-70 असायला हवे, मात्र ब्लड प्रेशर नॉर्मल नव्हते'.
मृत्यूच्या दाढेतून आरजी सुमित कसा बचावला? (RJ Sumit Health Interview Kidney Biopsy and Treatment)
आरजे सुमितच्या शरीरातील पाणी पातळीही कमी झाली होती. या गंभीर परिस्थितीचे कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्याला दारूचे व्यसन किंवा जिमसाठी स्टिरॉइड्स घेण्याबाबत विचारपूस केली, परंतु सुमितनं या सर्व गोष्टींना नकार दिला होता. त्यानं यातल्या कोणत्याच गोष्टी केलेल्या नाहीत. कारणाचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांनी 1 बायोप्सी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये किडनीचा एक लहान तुकडा काढून त्याचे संशोधन केले जाते. मात्र, या तपासणीतूनही आणि पूर्वीच्या गोळ्यांच्या परिणामातूनही नेमके कारण स्पष्ट झाले नाही. अखेर सखोल तपासणीनंतर असे उघडकीस आले की, फूड पॉयझनिंग आणि त्यानंतर झालेल्या भयंकर डिहायड्रेशनमुळे किडन्यांनी काम करणे थांबवले होते. किडनीच्या नलिकांना इजा झाली होती.
यापूर्वी सोशल मीडियावर त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यातून त्यानं त्याच्यावर चार डायलेसिस करण्यात आली, अशी माहिती दिली होती. डिहायड्रेशनमुळे किडनीच्या नलिकांमध्ये जखमा झाल्या होत्या. लघवीची प्रक्रिया थांबली होती. जर डायलिसीस केले नसते, तर मृत्यू ओढवण्याचा किंवा कोमात जाण्याचा धोका वाढला असता, असं त्यानं सांगितलं. यावेळी त्यानं सगळ्यांना, त्रास जाणवल्यास रक्त तपासणी आणि किडनीची तपासणी करावी, असा मोलाचा सल्ला दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये मोठा ट्विस्ट; बापूजींचा मृत्यू झाला? जेठालालचं रडू थांबेना
