KL Rahul Athiya Shetty Wedding : बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अथिया आणि केएल राहुल 23 जानेवारीला सात फेरे घेतील. यासाठी कपलच्या कुटुंबियांनी पूर्ण तयारी केली आहे. अथिया आणि केएल राहुलच्या फंक्शन्सशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊयात.

दोघांचं लग्न कुठे होणार? 

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचा विवाह सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर होणार आहे. काल एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये फार्महाऊसमध्ये मंडपची तयारी सुरु होती. याआधी केएल राहुलच्या घराचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याचे घर दिव्यांनी सजवलेले दिसत होते.

सुनील शेट्टीने लग्न घोषित केलं 

सुनील शेट्टी रविवारी लग्नाच्या स्थळी पोहोचले आणि मीडियाशी म्हणाले, 'तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. उद्या मी मुलांना घेऊन येईन तुम्हा लोकांना भेटायला. अशाप्रकारे खुद्द सुनील शेट्टीनेच पुष्टी केली आहे की उद्या म्हणजेच 23 जानेवारीला केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकणार आहेत.

लग्नाआधीची पार्टी

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या फंक्शन्सची आज एका ग्रँड कॉकटेल पार्टीने सुरुवात झाली आहे. ही पार्टी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसाठी ठेवण्यात आली होती. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, पाहुण्यांना जवळच्याच एका आलिशान हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून ते लग्नाच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील.

हळदी आणि मेहेंदी समारंभ

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा हळदी आणि मेहेंदी समारंभ आज फार्महाऊसवर होणार आहे. यासाठी फार्महाऊस फुलांनी सजवण्यात आले आहे. ई-टाइम्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत सात फेरे घेतील.

पाहुण्यांना दक्षिण भारतीय जेवणाची मेजवानी

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नात पाहुण्यांना दक्षिण भारतीय जेवणाची मेजवानी असणार आहे. साऊथची परंपरा लक्षात घेऊन त्यांना केळीच्या पानावर जेवण दिले जाणार आहे. 

रिसेप्शन पार्टीला 3 हजार पाहुण्यांची उपस्थिती

या कपलच्या लग्नानंतर मुंबईत भव्य रिसेप्शन देण्यात येणार आहे, ज्यामध्ये मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे. या पार्टीला तीन हजार पाहुण्यांची उपस्थिती असेल. 

केएल राहुल आणि अथियाची लव्हस्टोरी 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांची पहिली भेट 2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले. काही काळानंतर दोघे खूप चांगले मित्र बनले आणि हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जरी दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या पुष्टी केली नसली तरी, हे जोडपे अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा