Kishori Pednekar On Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या Gen Z (तरुणाईच्या) आंदोलनावर अत्यंत तीव्र आणि बोचरी टीका केली आहे. जनंत मंतरवर आंदोलन करणाऱ्या आंदोलक तरुणांना थेट 'गटारछाप पिढी' असे कंगना रणौतने संबोधले. तसेच माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी इतका कुरूप, उथळ आणि असभ्य प्रकार कधीच पाहिला नाही, असंही कंगना रणौत म्हणाली. कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कंगना रणौतवर हल्लाबोल केला आहे.
कंगना रणौत घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे- किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar On Kangana Ranaut)
किशोरी पेडणेकर यांना कंगना रणौत यांनी केलेल्या विधानावर माध्यमांशी विचारताच ती घाणेरडी नटी आहे. तिच्यावर थू केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे. अशी घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं...अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.
कंगना रणौत नेमकं काय म्हणाली होती? (Kangana Ranaut On CJP Protest)
दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनात सहभागी झालेल्या Gen Z तरुणांच्या भाषेवर आणि वर्तनावर कंगनाने आक्षेप घेत त्यांना 'गटारछाप' म्हटले आहे. भारत हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला 'कॉकरोच' म्हणता आणि त्यांच्यासारखेच वागता. तुम्ही जगासमोर फक्त घाण आणि विद्रूपता मांडत आहात, असे म्हणत तिने "यांना जन्म कोण देतंय? असा संतप्त सवालही कंगना रणौतने केला. या आंदोलनाचे व्हिडीओ पाहून मानसिक धक्का बसल्यामुळे आता स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला 'डिजिटल डिटॉक्स'ची (सोशल मीडियापासून दूर राहण्याची) गरज असल्याचंही कंगना म्हणाली. तसेच समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं ते अभिमानानं प्रदर्शन करतात, अशी टीकाही कंगना रणौतने केली.
आम्ही कधीही आमच्या पालकांवर ओझे बनलो नाही- कंगना रणौत (Kangana Ranaut On Cockroach Janta Party)
आपल्या 75 वर्षीय पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्या दिवंगत मातेबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली गेली. आम्हीही विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहोत; पण हे नक्की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि ती कसली अश्लील भाषा वापरत आहेत? ते विद्यार्थ्यांसारखे तरी वाटतात का? भविष्यात जर या लोकांना सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची किंवा कायदेशीर मदतीची गरज भासली, तर त्यांचे पालक त्याचा खर्च पेलू शकतील का? स्वतःकडे तर त्यासाठी पैसे नाहीत. आम्ही वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच स्वतःची कारकीर्द घडवत आहोत; आम्ही कधीही आमच्या पालकांवर ओझे बनलो नाही... एक समाज म्हणून, हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असंही कंगना रणौतने सांगितले.
