Marathi Actor on Ladki Bahin Yojana : सध्या सुरु असलेल्या अनेक महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र पुरता हादरुन गेलाय. कोल्हापूर, बदलापूर येथील घटनांनी मन अगदी सुन्न झालं. बदलापूरमधील घटनेवेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जो रोष व्यक्त केला गेला त्याची कोर्टानेसुद्धा गंभीररित्या दखल घेतली. असं असतानाच दुसरीकडे महायुती सरकारच्या (Mahayuti Government) लाडकी बहिण योजनेची (Ladki Bahin Yojana) देखील बरीच चर्चा सुरु आहे. पण आम्हा महिलांना पैसे नको पण सुरक्षा द्या अशी मागणी या घटनांनंतर राज्यातील महिलावर्गाकडून केली जातेय. त्यावर आता एका मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आलीये. 


लाडकी बहिण योजनेअंतर्गत सरकारकडून महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जमा होणार आहेत. रक्षाबंधनची भेट म्हणून पहिल्याच महिन्यात या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आले. पण सध्या सुरु असलेल्या या अत्याचारांच्या घटनेनंतर महिलांकडून सुरक्षेची मागणी पटलावर घेतली जातेय. यावर किरण माने यांनी पोस्ट करत महिलांना सल्ला दिलाय. 


किरण माने यांची पोस्ट काय?


अभिनेते आणि ठाकरे गटाचे किरण माने यांनी पोस्ट करत म्हटलं की,  लाडक्या बहिणींनो, पैसे परत करू नका. ते त्यांच्या खिशातले नाहीत. आपलेच आहेत. ते पैसे देण्यामागं त्यांचा जो कावा आहे, तो साध्य होऊ देऊ नका. या भुरट्यांना 'मत' देऊ नका !ठेचायची तर 'नांगी'... नको तिथे घाव घालायचा नाही. पैसे घ्या...पण मत देऊ नका. विषय कट.


 



बदलापूरमधील घटनेचा महाविकास आघाडीकडून निषेध


बदलापूरमधील एका शाळेमध्ये चिमुकल्या मुलींचं कंत्राटी कर्मचाऱ्यांने लैंगिक शोषण केलं. त्यानंतर नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत यावर सरकारकडे जबाब मागितला. संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटत होते. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. पण कोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवला. त्यानंतर महाविका आघाडीकडून महाराष्ट्रभरात आंदोलनाची हाक देण्यात आली.                                                                           


ही बातमी वाचा : 


Raj Thackeray Movie :  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी 'यक नंबर' जनमत बदलणार? चित्रपटांचा राजकीय प्रभाव