Kiran Mane on Chinmay Mandlekar wife Video : सध्या सोशल मीडियावर चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा विषय बराच तापला आहे. मुलाचं नाव जहांगीर, महाराजांची भूमिका साकारणं या दोन मुद्द्यांना एकत्र करुन चिन्मय आणि त्याच्या मुलाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं आहे. त्यावर सुरुवातीला चिन्मयच्या पत्नीने एक व्हिडिओ पोस्ट करत या सगळ्यावर तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर चिन्मयने महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. पण या सगळ्यात नेहाने (Neha Joshi Mandlekar) म्हणजेच चिन्मयच्या पत्नीने तिच्या व्हिडिओमध्ये केलेल्या जात आणि धर्माच्या उल्लेखावरुन किरण माने (Kiran Mane) यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. 


चिन्मयला पाठिंबा देत अनेक कलाकार मंडळींनी या ट्रोलिंगचा निषेध केला. तसाच तो किरण माने यांनी देखील केला आहे. पण त्याचबरोबर त्यांनी यावर भाष्य करत चिन्मयच्या भूमिकेला पाठिंबा दिला नसल्याचंही स्पष्ट होत आहे. चिन्मयने घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनंती देखील त्याला अनेक कलाकारांनी केली आहे. पण यावर किरण माने यांनी केलेल्या पोस्टमुळे विशेष लक्ष वेधून घेतलं. 


 हे सांगणं फार भयानक  - किरण माने


किरण माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'परवा चिन्मय मांडलेकरवर त्या मानाने खुप छोटंसं, किरकोळ ट्रोलींग झालं. खरंतर तेही चुकीचंच होतं. पण आजकाल जनरली जे होतं त्या तुलनेत खुपच सौम्य होतं. पण त्यानंतर त्याच्या पत्नीने प्रतिक्रिया देताना, "मी ब्राह्मण आहे आणि तो कासार आहे. आम्ही हिंदू आहोत." हे सांगणं फार भयानक होतं. सिंपथीसाठी असेल किंवा रागाच्या भरात असेल, पण हा वाद भलत्याच दिशेला नेणारं आणि असंबद्ध होतं. ट्रोल्सच्या हेतुंना बळकटी देणारं होतं.'


जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून.... - किरण माने


पुढे त्यांनी म्हटलं की, 'धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्‍या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्‍या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, 'त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे. याला म्हणतात 'संविधान धोक्यात येणं'. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं 'स्वातंत्र्य' ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून 'समता' नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर 'बंधुता' निर्माण कशी होणार?  बास, एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या'



ही बातमी वाचा :


Chinmay Mandlekar : मालोजी राजेंचे उदाहरण देत ज्येष्ठ अभिनेत्याने दिला चिन्मय मांडलेकरला पाठिंबा, येड्याचा बाजार अन्...