Kim Kardashian Net Worth: अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार (American Reality TV Star) किम कार्दशियन (Kim Kardashian) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. सध्या किम तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आपल्या युरोपियन व्हेकेशनवेळी पसरलेल्या डेटिंगच्या अफवांदरम्यान किम आणि ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर आणि फॉर्म्युला 1 चॅम्पियन लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) यांनी त्यांचं नातं जगासमोर आणलं आहे. 

सुपर बाउल LX मध्ये एकत्र येऊन या जोडप्यानं त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला. त्यांच्या उपस्थितीनं सर्वांचं लक्ष वेधलं आणि त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. किम कार्दशियन आणि लुईस हॅमिल्टन यांनी सुपर बाउल LX मध्ये त्यांच्या नात्याला अधिकृत केलं. रविवारी (८ फेब्रुवारी) कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथील लेव्हीज स्टेडियममध्ये हे जोडपं एकत्र खेळाचा आनंद घेत असल्याचं दिसून आलं. 

न्यू इंग्लंड पॅट्रियट्स आणि सिएटल सीहॉक्स यांच्यातील सुपर बाउल LX सामन्याच्या आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टदरम्यान जेव्हा या जोडप्याला मोठ्या पडद्यावर काही वेळासाठी दाखवण्यात आलं, तेव्हा त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांना एकत्र पाहून सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या. 

एकमेकांसोबत कोजी टाईम स्पेंड करतायत किम आणि लुईस

व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये 45 वर्षांची किम कार्दशियन, 41 वर्षांच्या लुईस हॅमिल्टनशी बोलताना हसताना दिसत होती. या हाय-प्रोफाइल आउटिंगसाठी, किमनं काळ्या रंगाचा कोट आणि डायमंड चोकर नेकलेस वेअर केलेला आणि तिच्या केसांना स्टायलिश बॅंग्सनी स्टाईल केलेलं. लुईसनं किमच्या स्टाईलला मॅच करत ऑल-ब्लॅक ड्रेस वेअर केला होता. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "किम आणि लुईसच्या कामाचं वेळापत्रक खूप व्यस्त आहे, म्हणून ते शक्य तितका वेळ एकत्र घालवण्याचा प्रयत्न करतात. सध्या, ते एकमेकांसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि किमच्या वर्क कमिटमेंट्सचा विचार करुन आपल्या डेट्स प्लान करतात..." 

किम अन् लुईसचं नेटवर्थ किती? 

किम अन् लुईसचं नेटवर्थबद्दल बोलायचं झालं तर, किमने सेलिब्रिटी कल्चरमध्ये एक मोठं साम्राज्य उभं केलंय. सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 2 अब्ज डॉलर आहे. रिपोर्टनुसार, लुईसची एकूण संपत्ती अंदाजे 450 दशलक्ष डॉलर्स आहे. हे आकडे देखील सेलिब्रिटी नेट वर्थमधून घेतलेले आहेत.