kiara advani ram gopal varma war 2 : दिग्दर्शक अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेला अॅक्शन आणि थ्रिलर असलेला 'वॉर 2' या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमात अभिनेता ऋतिक रोशन आणि जुनिअर एनटीआर आमने-सामने आलेले पाहायला मिळालेत, तर अभिनेत्री कियारा अडवाणी (kiara advani) लीड रोलमध्ये दिसत आहे. हा टिझर 1 मिनीट 34 सेकंदाचा आहे. या टिझरमध्ये कियारा अडवणी केवळ 2 ते 3 सेकंदासाठी दिसली आहे. मात्र, पूर्ण टिझरमध्ये तिच भाव खाऊन गेलीये. या टिझरमध्ये कियारा अडवाणी (kiara advani) बिकनी लूकमध्ये पाहायाला मिळत आहे. सध्या कियारा अडवाणीचा हा बिकनी लूक प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. दरम्यान, कियारा अडवाणीच्या या बिकनी लूकवर बोलताना फिल्ममेकर राम गोपाल वर्माची (ram gopal varma) जीभ घसरलीये. त्याने तिच्याबद्दल एक ट्वीट केलं होतं. ज्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 

Ram Gopal Varma ने कियारा अडवाणीबद्दल केलेलं ट्वीट त्याला डिलीट करावं लागलं आहे. मात्र, त्याच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी राम गोपाल वर्माला ट्रोल केलंय. काही लोकांनी राम गोपाल वर्माला ठरकी असल्याचं म्हटलं आहे. अशा अनेक कमेंट्स राम गोपाल वर्माच्या ट्वीटवर आल्या होत्या. मात्र, आता त्याने हे ट्वीट डिलीट केलंय. 

राम गोपाल वर्मा काय काय म्हणाला होता?

राम गोपाल वर्माने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कियारा अडवाणीचा फोटो शेअर करत लिहिले की, जर हृतिक आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील हे युद्ध देश आणि समाजाऐवजी तिची (कियारा) 'बॅक' कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी असेल, तर हा भाग (चित्रपटाचा दुसरा भाग) 'ब्लॉक बस्टर' ठरेल.

'वॉर 2' YRF स्पाई यूनिवर्सच्या सिरीजमधील सहावा सिनेमा आहे.  हा सिनेमा 2019 मधील वॉरचा सिक्वल आहे. हा सिनेमा 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात जूनियरर एनटीआर आणि कियारा यांच्याशिवाय आशुतोष राणा देखील पाहायला मिळणार आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suniel Shetty Angry: 'सबको एक्सपोज कर दूंगा...', लेकाबाबत निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना सुनील शेट्टीनं फटकारलं, 'बॉर्डर 2'बाबत म्हणाला...