Khesari Lal Yadav Stage video: भोजपूरी स्टार खेसारी लाल यादव कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. खेसारी लाल यादवचा एक स्टेज शो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. लोक आणि त्याचे चाहते अभिनेत्याला पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान, त्याच्या शोमधील एका व्हिडीओने सोशल मीडियात खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्याने अलिकडेच स्टेजवर परफॉर्म केला होता. खेसारीने स्टेजवर अश्लीलतेची मर्यादा ओलांडली. व्हिडीओवरुन सध्या त्याला ट्रोल केलं जात आहे. खेसारी लाल यादवने स्टेजवर नेमकं काय केलं? याची सध्या खेसारी लाल यादवचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
खेसारी लाल यादवचा स्टेजवरील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Khesari Lal Yadav Faces Trolling Over Viral Stage Performance)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खेसारी लाल यादव भोजपूरी अभिनेत्री ऋतू सिंहसोबत दिसत आहे. अभिनेत्री विवाहित असून, तिच्यासोबत त्याने सर्व मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. खेसारी लाल यादव याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये खेसारी लाल यादव स्टेजवर ऋतूसोबत रोमँटिक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी तो तिच्या खूप जवळ येऊन, अभिनेत्रीकडे एकटक पाहतो. तर, कधी शर्ट काढून ऋतूला मिठी मारतो. शेकडो लोकांसमोर तो ऋतूसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. खेसारी लाल यादव आणि ऋतूचा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये खेसारी लाल यादव ऋतूच्या इतक्या जवळ आला की, काही क्षणासाठी वाटलं की, तो तिचा Kiss घेईल. खेसारी लाल यादव यावरच नाही थांबला. त्याने स्टेजवरच ऋतूकडे Kissची मागणी केली. खेसारी लाल यादव स्टेजवर म्हणतो की, 'आम्ही सिनेमात अनेकदा तिचा Kiss घेतला आहे. तुम्ही लोकांनी ते पाहिलं आहे, बरोबर ना? जर सिनेमात घेऊ शकतो, तर बाहेर Kiss करु शकत नाही का?', असा सवाल त्याने उपस्थित केला. अभिनेत्याचे हे शब्द ऐकून ऋतूला प्रचंड धक्का बसला. ती म्हणते, 'मुळीच नाही'. खेसारी म्हणतो, 'ठीक आहे. मग मी करणार नाही. जो कुणी देईल, त्याची Kiss घेईन'. यावेळी स्टेजवर खेसारी लाल यादवने आपली बॉडी दाखवली. तो आपल्या शर्टलेस अवतारात दिसला.
तर, आणखी एका व्हायरल व्हिडीओमध्ये खेसारी लाल यादव अभिनेत्री ऋतूला जवळ घेतो. काही काळ तो तिला सोडतच नाही. भर कार्यक्रमात खेसारी अभिनेत्रीला घट्ट मिठीत घेतो. त्याचे या कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी व्हिडीओच्या कमेंटमधून अभिनेत्याला फटकारले. 'याच कारणामुळे भोजपूरी इंडस्ट्री बदनाम आहे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
