Kesari Chapter 2 Box Office Collection Day 5: 'केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' 18 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, अनन्या पांडे आणि आर माधवन अभिनीत हिस्टॉरिकल ड्रामा असलेल्या या चित्रपटानं, थिएटरमध्ये पाच दिवस पूर्ण केले आहेत. करण सिंह त्यागी दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली. आठवड्याच्या शेवटीही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली होती, पण, विकडेजमध्ये येताच चित्रपटाचं कलेक्शन काही प्रमाणात घटल्याचं पाहायला मिळत आहे. 'केसरी चॅप्टर 2'नं रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच, पहिल्या मंगळवारी किती कमाई केली?
'केसरी चॅप्टर 2'नं पाचव्या दिवशी किती कमाई केली?
जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित 'केसरी चॅप्टर 2' मध्ये अक्षय कुमारनं वकील सी शंकरन नायर यांची प्रभावी भूमिका साकारली आहे. या देशभक्तीपर चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. जरी चित्रपटाला मोठा नफा मिळत नसला तरी, बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी चांगली होत आहे. भारतातील 'केसरी चॅप्टर 2' च्या पाच दिवसांच्या कलेक्शनबाबत सविस्त जाणून घेऊयात...
- 'केसरी चॅप्टर 2' नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.75 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 9.75 कोटी रुपये कमावलेत.
- तिसऱ्या दिवशी 'केसरी चॅप्टर 2'चं कलेक्शन 12 कोटी रुपये होतं.
- चौथ्या दिवशी या चित्रपटानं 4.5 कोटी रुपये कमावलेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'केसरी चॅप्टर 2'नं पाचव्या दिवशी 4.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- यासह, 'केसरी चॅप्टर 2' ची 5 दिवसांत एकूण कमाई आता 38.75 कोटी रुपये झाली आहे.
'केसरी चॅप्टर 2' 50 कोटींपासून किती दूर आहे?
'केसरी चॅप्टर 2' प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत आणि या चित्रपटानं 38.75 कोटी रुपये कमावले आहेत. ते आता 50 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी हा चित्रपट हा आकडा ओलांडेल अशी अपेक्षा आहे. तसेच, चित्रपटाचं बजेट 150 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या, चित्रपटाला त्याच्या खर्चाच्या निम्मीही रक्कम वसूल करता आलेली नाही; आता त्याचं बजेट कधी वसूल होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'केसरी चॅप्टर 2' ची कमाई वाढवण्यासाठी निर्मात्यांनी लढवली शक्कल
'केसरी चॅप्टर 2' च्या निर्मात्यांनी आठवड्याच्या मध्यात कमाई वाढवण्यासाठी एक स्मार्ट रणनीती अवलंबली आहे. खरंतर चित्रपटाचं तिकीट 99 रुपयांना उपलब्ध आहे. आता या ऑफरमुळे चित्रपटाची कमाई किती वाढते हे पाहायचं आहे.
कोविडनंतर अक्षय कुमारच्या चित्रपटांची कमाई
'केसरी चॅप्टर 2'नं याआधी फक्त तीनच दिवसांत सेल्फी, सरफिरा आणि बेल बॉटम या चित्रपटांच्या आयुष्यभराच्या कलेक्शनला मागे टाकलं होतं. आता तो 'मिशन राणीगंज'ला मागे टाकत अक्षय कुमारचा कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा दहावा चित्रपट बनला आहे. दुसरा वीकेंड येण्यापूर्वी, तो 'खेल खेल में' आणि 'रक्षाबंधन' या चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकेल. दरम्यान, पहिल्या 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना 66 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लागेल.
अक्षय कुमारच्या कोविडनंतरच्या चित्रपटांच्या भारतातील कमाईचे आकडे
- सूर्यवंशी : 195.04 कोटी
- ओएमजी 2 : 150 कोटी
- स्काय फोर्स : 134.93 कोटी
- सम्राट पृथ्वीराज : 68 कोटी रुपये
- बडे मियाँ छोटे मियाँ : 66 कोटी
- राम सेतू : 64 कोटी
- बच्चन पांडे : 50.25 कोटी
- रक्षाबंधन : 44.37 कोटी रुपये
- खेल खेल में : 40.32 कोटी
- केसरी चॅप्टर २ : 38.75 कोटी रुपये
- मिशन राणीगंज : 31 कोटी
- बेल बॉटम : 26.50 कोटी
- सरफिरा : 24.30 कोटी
- सेल्फी : 16.50 कोटी रुपये
महत्त्वाच्या इतर बातम्या :