Mandar Shinde On Brother Kedar Shinde: मंदार शिंदे (Mandar Shinde), एकेकाळचं मराठी मनोरंजन विश्वातलं मोठं नाव आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचे धाकटे बंधू. शाहीर साबळे (Shahir Krishnarao Sable) यांची ही दोन्ही नातवंडं. लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर असताना मंदार शिंदे यांच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडल्या, ज्यामुळे ते मनोरंजन विश्वापासून दुरावले गेले, एवढंच काय तर, कित्येक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकावर ड्रायव्हिंग करण्याचीही वेळ ओढवली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मंदार शिंदे यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांसोबतच अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. 

Continues below advertisement

केदार शिंदे यांचे बंधू मंदार शिंदे नेमकं काय म्हणाले? (Mandar Shinde On Kedar Shinde)

कधीकाळी मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मंदार शिंदे यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, "मी जर चांगला दिग्दर्शक नसतो, तर इतक्या मालिका मी स्वतः दिग्दर्शित केल्या, ज्या चॅनलला टेलिकास्ट होत होत्या. TRP उच्च होते, ते श्रेय फक्त कलाकारांचं आहे? त्या कॅमेराच्या मागचा दिग्दर्शक नव्हता? रागही येतो पण सांगायचं कोणाला? मी सध्या एका व्यापाऱ्याकडे ड्रायव्हिंगचा जॉब करतोय. सुरुवातीला थोडं वाईट वाटलं, पण मला माझं घर चालवायचं आहे, त्यामुळे मला करावं लागलं..."

नशीब जसं तुम्हाला टोकावर नेत असतं आणि अचानक एका टोकावरुन तुम्हाला खाली पाडतं... : मंदार शिंदे

पुढे बोलताना मंदार शिंदे म्हणाले की, "नशीब जसं तुम्हाला टोकावर नेत असतं आणि अचानक एका टोकावरुन तुम्हाला खाली पाडतं... त्या दरम्यान केदारदादाला एक मालिका मिळाली. काय करतोयस? ये, शूटिंगला असं ते म्हणाले. माझं तिथे काम होतं, कपडे आणि चपला न्यायच्या कलाकारांच्या आणि ते त्यांना द्यायच्या... 100 रुपये मिळायचे... पुढे मला स्वतःला एक चित्रपट दिग्दर्शित करायची संधी मिळाली आणि थोडीशी नाराजी झाली. अचानक मला कळलं नाही की, 4-5 दिवसांनी तो चित्रपट निर्मात्यानं का उतरवला... तिथून मग माझं काम पूर्णपणे बंद झालं..."

Continues below advertisement

"आपल्या इंडस्ट्रीला आजही हा शाप आहे की, कंपू आहेत. कलाकार कितीही हुशारीचा असला, चांगलं काम करत असला तरीही त्याला द्यायचं नाही. म्हणजे, इथे घरातूनच काम मिळत नाही, तर बाहेरच्यांकडे काय मागू..?", असं मंदार शिंदे म्हणाले. 

दरम्यान, कधीकाळी दिग्दर्शक, निर्माते म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदार शिंदेंनी अनेक मालिका, सिनेमे आणि मोठमोठे इव्हेंट्स केलेत. अशातच मराठीतील गाजलेले सिनेमे जत्रा, अगंबाई अरेच्चा! यांसारख्या सिनेमांच्या निर्मितीमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bhagyashree Nhalave Mother Passes Away: मराठी अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; दोनच महिन्यांपूर्वी झालेलं लग्न, म्हणाली, 'म्हणून मला लग्नच करायचं नव्हतं...'