KBC Junior Overconfident Contestant Boy: पाचवीत शिकणारा इशित भट्ट (Ishit Bhatt) सध्या 'कौन बनेगा करोडपती सीझन 17'मध्ये (Kaun Banega Crorepati) त्यानं लावलेल्या उपस्थितीमुळे चर्चेत आहे. 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करत असलेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबतचं या मुलाचं वागणं फारच विचित्र, उद्धट आणि उर्मट होतं. शोमधला त्याचा अतिशहाणपणा दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आणि जवळपास अख्खं सोशल मीडिया त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर तुटून पडलं. फक्त पाचवीतल्या मुलाचं बॉलिवूडच्या महानायकासोबतचं एवढं उर्मट वागणं नेटकऱ्यांना अजिबात पटलं नाही आणि यामुळेच पाचवीत शिकणाऱ्या इशित भट्टवर टीकेची झोड उठली. संपूर्ण शोमध्ये तो वाट्टेल तसं, वाट्टेल ते बोलताना दिसला. त्याचा ओव्हरकॉन्फिडन्स एवढा होता की, त्याला शोमधून रिकाम्या हातानं घरी जावं लागलं. पण, तुम्हाला माहितीय का? असं काही पहिल्यांदा घडलं नाही. साधारणतः दोन वर्षांपूर्वी, सीझन 15 मध्ये, एका 8 वर्षांच्या मुलानं असंच काहीतरी केलेलं.
2023 मध्ये 'कौन बनेगा करोडपती 15'च्या नोव्हेंबरच्या भागात, विराट अय्यर नावाचा चिमुकला हॉटसीटवर बसलेला. त्याला शाळेत 'गुगल बॉय' म्हणून ओळखलं जायचं आणि त्यानं केबीसीमध्येही सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन स्वतःला सिद्धही केलं. पण, ज्यावेळी त्यानं एक कोटींचा टप्पा गाठला, त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स गगनात मावेनासा झाला आणि त्याच कॉन्फिडन्सचं रुपांतर ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधी झालं, त्याचं त्यालाच कळलं नाही. त्यानंतर त्यानं त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे मिळवलेली सर्वच्या सर्व रक्कम गमावली. त्यावेळी कितीतरी वेळ मुलाच्या हुशारीचा अभिमान बाळगून बसलेल्या आई-वडिलांना त्यावेळी मोठा धक्का बसला.
विराट अय्यरला विचारलेला 1 कोटींचा प्रश्न
विराट अय्यरनं त्याला विचारण्यात आलेल्या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर चुकवलं आणि तो केवळ 3 लाख 20 हजार रुपये आपल्यासोबत घेऊन गेला. त्यावेळी त्यानं खेळ क्विट केला नाही आणि त्याला कॉन्फिडन्स होता की, त्यानं दिलेलं उत्तर अगदीच अचूक आहे. पण, त्याचं उत्तर चुकीचं ठरलं. त्यानं जर त्यापूर्वीच शो क्विट केला असता, तर तो स्वतःसोबत 50 लाखांची रक्कम घेऊन गेला असता.
1 कोटींसाठी विराटला विचारलेला प्रश्न नेमका काय होता?
पीरियॉडिक टेबलमध्ये 96 आणि 109 परमाणु संख्या असणाऱ्या दो तत्वांच्या नावाबाबत काय विशेष आहे?
(A) नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावावर आहे
(B) महिला शास्त्रज्ञांच्या नावावर आहे
(C) भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर आहे
(D) यापैकी एकही नाही
विराट अय्यरनं गमावले 47,00,000 कोटी
विराटकडे कोणतीही लाईफलाईन शिल्लक नव्हती. त्यानं उत्तर दिलं A) नोबेल पारितोषिक विजेते, पण बरोबर उत्तर होतं ब) महिला शास्त्रज्ञ. त्याचं उत्तर चुकल्यामुळे त्याच्याकडे अखेर 3 लाख 20 हजार रुपयेच शिल्लक राहिले. अमिताभ बच्चन यांनी टिप्पणी केली की, जर विराटला योग्य उत्तर माहीत नसेल, तर त्यानं शो क्विट करायला हवा होता. त्यासोबतच त्याच्या तल्लख बुद्धिमत्तेचंही अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलेलं. त्यानं त्यावेळी तब्बल 47 लाख रुपये गमावलेले.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :