Kaun Banega Crorepati 17 Ishit Bhatt: 'कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर'मध्ये (Kaun Banega Crorepati 17) नुकताच दिसलेला दहा वर्षांच्या इशित भट्टच्या (Ishit Bhatt) वागण्यानं सारेच हैराण झालेले. बॉलिवूड (Bollywood News) महानायक (Amitabh Bachchan) यांच्यासमोर बसून त्याचं उद्धट, उर्मट वागणं साऱ्यांनाट खटकलं. त्याच्या संस्कारांपर्यंत सारेजण पोहोचलेले. अशातच आता लहानग्या इशितनं एक व्हिडीओ शेअर करुन बिग बींची माफी मागितली आहे. हॉटसीटवर बसल्यानंतर तो ज्यापद्धतीनं अमिताभ बच्चन यांच्याशी वागला, त्याचा त्याला पश्चाताप होत असल्याचं इशितनं म्हटलं आहे.  

Continues below advertisement


इशित भट्टनं व्हिडीओमध्ये काय म्हटलंय? 


 इशित भट्टनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल माफी मागितली आहे. इशितनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये तो म्हणतो की, त्याला त्याच्या वागण्याबद्दल पश्चात्ताप आहे आणि असं करण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. इशितनं बच्चन यांच्याशी असं का वागला? हे देखील स्पष्ट केलं आहे.


गुजरातच्या गांधीनगर येथील रहिवाशी असलेल्या इशित भट्टनं अलिकडेच हॉट सीटवर बसून केबीसी गेम खेळला. दरम्यान, इशित त्याच्या खेळापेक्षा, हॉटसीटवर बसल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्याच्या असभ्य वर्तनामुळे चर्चेत आला. तो ज्या पद्धतीनं बिग बींसोबत बोलत होता, त्यावरुन लोकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. पण, आता इशित भट्टनं आपल्या वागण्याबाबत जाहीर माफी मागितली आहे. 


इशितनं नेमकं केलेलं काय?


'कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर'मध्ये इशित भट्ट हॉटसीटवर आला आणि त्यानं आपल्या उर्मट, उद्धट वागण्यानं सर्वांचं लक्ष वेधलं. इशित संपूर्ण वेळ संयम सुटल्यासारखा वागत होता. जेव्हा-जेव्हा अमिताभ बच्चन प्रश्न विचारायचे, तेव्हा पर्याय जाहीर होण्यापूर्वीच इशित त्यांना उत्तर द्यायचा आणि उद्धटपणे उत्तर लॉक करायला सांगायचा. अमिताभ खेळाचे नियम समजावून सांगणार असतानाच इशित त्यांना थांबवायचा आणि म्हणायचा, "मला नियम समजावून सांगण्याची तसदी घेऊ नका... मला ते सर्व माहीत आहेत..."






इशित भट्टनं अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या असभ्य वागण्यानं नेटकऱ्यांचा राग अनावर झाला. नेटकऱ्यांनी इशितला झोडपलंच, पण त्यासोबतच त्याच्या पालकांनाही धारेवर धरलं, त्यांच्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही सेलिब्रिटींनी इशित भट्टलाही जोरदार फटकारलं. दरम्यान, आता इशित भट्टनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली.


व्हिडीओमध्ये इशितनं काय म्हटलंय? 


इशित भट्टनं 'कौन बनेगा करोडपती 17 ज्युनियर'च्या एका एपिसोडमधील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा स्वतःचा व्हिडीओ शेअर केला. त्यानं लिहिलंय की, "सर्वांना नमस्कार, 'कौन बनेगा करोडपती' मधील माझ्या वागण्याबद्दल मी मनापासून माफी मागू इच्छितो. मला माहीत आहे की, माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक लोक दुखावले गेले, नाराज झाले आणि त्यांचा अपमान झाला आणि मला त्याचा खूप पश्चात्ताप झालाय. मी त्यावेळी घाबरलो होतो आणि माझा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा होता... माझा असभ्य वागण्याचा हेतू नव्हता... मला अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण 'केबीसी' टीमबद्दल खूप आदर आहे..." 


"शब्द आणि कृती, आपलं व्यक्तिमत्व कसं प्रतिबिंबित करतात, याबद्दल मी एक मोठा धडा शिकलोय, विशेषतः इतक्या मोठ्या व्यासपीठावर... मी भविष्यात आणखी विनम्र, आदरयुक्त आणि विचारशील राहण्याचं वचन देतो. ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि या चुकीतून मला शिकण्याची परवानगी दिली त्या सर्वांचे आभार..."