Katy Perry Former Canadian Prime Minister Justin Trudeau: सोशल मीडियावर (Social Media) एका हायप्रोफाईल जोडप्याच्या (High Profile Couple) रोमान्सची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकदा हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पुरावे देणारे फोटोही व्हायरल झालेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुप्रसिद्ध गायिका आणि राजकारणातील दिग्गज नेत्याच्या रोमँटिक फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. असाच आणखी एक फोटो त्यांचा पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यामध्ये जोडपं एकमेकांचा हात हातात घट्ट धरुन सेलिब्रेशनसाठी जात आहे. आम्ही ज्या हायप्रोफाईल जोडप्याबाबत सांगत आहोत, ते म्हणजे, कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (53) आणि त्यांची रुमर्ड गर्लफ्रेंड हॉलिवूड स्टार केटी पेरी  (40). काही दिवसांपूर्वी दोघांचे क्रूझवर किस करतानाचे फोटो व्हायरल झालेले. 

Continues below advertisement

डेटिंगच्या अफवांमध्ये हॉलिवूड सिंगर कॅटी पेरी (Hollywood Star Katy Perry) आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Former Canadian Prime Minister Justin Trudeau) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते पेरीच्या वाढदिवशी पॅरिसमध्ये एकमेकांचा हात घट्ट पकडून फिरताना दिसले. 

सुप्रसिद्ध गायिका पेरी आणि कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये एकत्र फिरताना दिसले. या व्हिडीओनंतर पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी पेरीच्या 45व्या वाढदिवशी फ्रान्सच्या राजधानीमध्ये संध्याकाळी एकत्र घालवली. या रोमॅन्टिक कपलच्या उपस्थितीनं रोमँटिक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं हे शहर प्रकाशझोतात आलंय. 

Continues below advertisement

सोशल मिडिया VIDEO जोरदार व्हायरल (Katy Perry and Justin Trudeau)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघेही हातात हात घालून चालताना दिसत आहेत. टीएमजेडच्या मते, दोघांना पहिल्यांदा क्रेझी हॉर्स पॅरिस (एक प्रसिद्ध पॅरिसियन कॅबरे) इथे पाहिले गेलेलं, जे शहराला भेट देणाऱ्या सेलिब्रिटींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. दोघांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी कमेंट्सचा पाऊल पाडलाय. एका युजरनं कमेंट केलीय की, "आम्हाला माहीत आहे, केटी डॉलर्ससाठी काहीही करेल..." दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, "हे दोघे एकमेकांना पात्र आहेत..." दुसऱ्याने म्हटलंय की, "हा पुरावा आहे की, तो समलैंगिक नाही..." आणखी एकानं असंही म्हटलंय की, "त्याला फक्त गायकाचे पैसे हवेत..."

दरम्यान, कॅनडाच्या पंतप्रधानांचा घटस्फोट झाला आहे आणि ते तीन मुलांचे वडील आहेत. 2023 मध्ये कॅनडाच्या पंतप्रधानांचा घटस्फोट झाला, तेव्हापासूनच ते नव्या प्रेमाच्या शोधात होते. अखेर त्यांना त्यांचं खरं प्रेम सापडलंच. केटी पेरी आणि जस्टिन ट्रुडो यांच्या रिलेशनच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. जस्टिन आणि केटी पेरी यांच्या वयात 13 वर्षांचा फरक आहे. 2016 मध्ये केटीने ऑर्लॅंडोला डेट करायला सुरुवात केली, पण पुढच्या वर्षी 2017 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. 2018 मध्ये दोघेही पुन्हा एकत्र आले. 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेला केटी आणि ऑर्लॅंडोनं लग्न केलं आणि 2020 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. या वर्षी केटीनं अभिनेता ऑर्लॅंडो ब्लूमशी ब्रेकअप केलं. केटीचं पहिलं लग्न 2010 मध्ये ब्रिटिश कॉमेडियन रसेल ब्रँडशी झालं होतं, जे फक्त वर्षभरच टिकलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Justin Trudeau & Katy Perry Kissing Photo: 13 वर्षांनी मोठ्या नेत्यासोबत जुळलंय 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं सूत; जो तीन मुलांचा पिता आहे, क्रूझवर किस करतानाचे फोटो व्हायरल