Vicky Kaushal Katrina Kaif announce baby boy name: बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ 7 नोव्हेंबर 2025 ला आई बाबा झाले. खास पद्धतीने त्या दोघांनीही ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता जवळपास दोन महिन्यानंतर दोघांनीही आपल्या मुलाचं नाव जाहीर केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना कतरिना आणि विकी आपल्या बाळाचे नाव काय ठेवतात याची उत्सुकता होती. दरम्यान, आपल्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत या जोडप्याने बाळाचं नाव ठेवल्याचंही सांगितलं. ही पोस्ट बघता बघता तुफान व्हायरल झाली आहे . त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रेटी आणि चाहते आनंद व्यक्त करतायत. 

Continues below advertisement

काय ठेवलंय बाळाचं नाव?

कतरीना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचे नाव विहान कौशल असं ठेवलंय. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत " आमचा लाडका विहान कौशल .. आमच्या प्रार्थनांना यश मिळालं. त्याच्या येण्यानं आयुष्य सुंदर झालंय. एका क्षणात आमचं संपूर्ण जग बदललंय. मी फक्त कृतज्ञता व्यक्त करेन! " असं लिहित बाळाची सुंदर झलकही चाहत्यांना दाखवलीय. या फोटोमध्ये दोघेही आपल्या बाळाचा हात हातात धरताना दिसत आहेत.

 

Continues below advertisement

त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्राण लिहिलं 'लिटिल बडी ' तर गायिका श्रेया घोषालनं " कतरीना आणि विकी यांचं अभिनंदन ' असं लिहिलंय. अभिनेत्री शिवानी दांडेकरनेही या पोस्टवर रेड हार्ट इमोजी शेअर केलाय.

काय आहे विहान नावाचा अर्थ ?

विहान हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे. या शब्दाचा अर्थ सूर्योदय, पहाट किंवा सकाळचा प्रकाश असा होतो. नव्या प्रवासाची किंवा युगाची सुरुवात असा अर्थही या नावाचा घेतला जातो.

कतरीना आणि विकी यांनी 2021 मध्ये लग्न केलं होतं. गेलं वर्ष विकीच्या आयुष्यात खूप खास ठरलं. एकीकडे छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातही नवीन बाळाच्या आगमनाने दोघेही आनंदी आहेत.