'कॅट' परतली! आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कटरीना; खळखळून हसली, एकाच स्माईलनं साऱ्यांची मनं जिंकली Video Viral
या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.तिच्या साध्या पण आकर्षक लूकचेही कौतुक होत आहे.

Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल आई बाबा झाल्यानंतर खूप खुश आहेत. दोघेही बाळाच्या लडिवाळ हसण्या खेळण्यात रमले आहेत. दरम्यान, आई झाल्यानंतर साधारण साडेतीन महिन्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसलीय. आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 7 नोव्हेंबर 2025 रोजी तिने मुलगा विहानला जन्म दिल्यानंतर ती लाइमलाईटपासून दूर होती. मात्र अलीकडे ती दिसताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.
कटरीनाने चेहऱ्यावर मास्क घातला होता, तरीही तिचा ग्लो स्पष्ट दिसत होता. कॅमेरे पाहताच तिने हात हलवत गोड हसू दिले आणि त्याने चाहत्यांची मने जिंकली. ती कारमध्ये बसलेली होती आणि तिच्यासोबत सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला देखील होती. यास्मिन या कटरीनाच्या फिटनेस ट्रेनर आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
कटरीनाला पाहून अनेक चाहते आनंद व्यक्त करत आहेत. झाले. “खूप दिवसांनी दिसलीस”, “कॅट, लवकर कमबॅक कर”, अशा प्रतिक्रिया व्हिडिओखाली पाहायला मिळत आहेत. तिच्या साध्या पण आकर्षक लूकचेही कौतुक होत आहे.
View this post on Instagram
वडील झाल्यानंतर विक्कीने काय सांगितले?
दरम्यान, कटरीनाचा पती आणि अभिनेता विकी कौशल याने नुकत्याच एका कार्यक्रमात वडील झाल्यानंतरचा अनुभव शेअर केला होता. तो म्हणालेला की मुलगा विहान अजून खूप लहान आहे आणि सध्या तो फक्त त्याला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. तो थोडा मोठा झाल्यावर त्याच्यासोबत अधिक वेळ घालवणार असल्याचेही विक्कीने म्हटले.
सप्टेंबरमध्ये दिली होती गुड न्यूज
कटरीना आणि विक्की यांनी सप्टेंबर 2025 मध्ये प्रेग्नन्सीची घोषणा केली होती आणि 7 नोव्हेंबरला मुलगा झाल्याची आनंदवार्ता दिली. 2021 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात करण जोहर यांच्या चॅट शोमधील एका मजेशीर प्रसंगातून झाली होती, अशी चर्चा आहे.सध्या मात्र आई झाल्यानंतर कटरीना पूर्णपणे मुलगा विहानच्या संगोपनात व्यस्त असून तिच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
























