Katrina Vickey AI photos with baby: बॉलीवूडचं लोकप्रिय आणि लाडकं सेलिब्रेटी जोडपं कतरिना कैफ (Katrina kaif) आणि विकी कौशल (vickey kaushal ) यांच्या घरी 7 नोव्हेंबर रोजी गोड बाळाचं आगमन झालं. मुलाच्या जन्मानंतर दोघांनीही गोपनीयता पाळत कोणतीही माहिती किंवा फोटो, बाळाची झलक न दाखवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता कितीही काळजी घेतली तरी सोशल मीडियावर एआयच्या (AI) माध्यमातून तयार केलेले विकी - कतरिना आणि त्यांच्या बाळाचे अनेक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.  AIने तयार केलेले फोटो हे इतके खरे वाटतात  की अनेकांच्या हे लक्षातही येत नाही की हे फोटो खोटे आहेत. 

बॉलीवूडच्या कुठल्याही लोकप्रिय जोडप्याला सोशल मीडियाचा होणारा त्रास आता नवा राहिला नसला तरी त्यांच्या खासगी, चार भिंतीतल्या गोष्टी विचित्र पद्धतीने बाहेर येऊ लागल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बाल्कनीत आराम करताना कतरिना कैफचे फोटो व्हायरल झाले होते. आता विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या मांडीवर घेतलंलं AI जनरेटेड बाळ व्हायरल होत असल्याने  पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

कतरीना विकी कौशलचे बाळासोबतचे AI जनरेटेड फोटो व्हायरल

सध्या सर्वाधिक शेअर होणाऱ्या फोटोंमध्ये विकी कौशल बाळाला हातात धरून बसलेला दिसतो. तर त्याच्या शेजारी कतरिना सुंदर पिवळ्या रंगाच्या स्ट्रॅपी ड्रेसमध्ये बसलेली दिसते. दुसऱ्या एका फोटोमध्ये कतरीना आपल्या नवजात बाळाला अलगद मांडीवर घेत असताना दिसते तर तिच्या शेजारी विकी कौशलची आई उभारलेली दिसते. एका वेगळ्या एआय फोटोमध्ये विकी कौशलच्या आईने बाळाला उचललं असून कतरीना आणि विकी दोघेही आनंदाने तिच्या शेजारी उभे असल्याचे दृश्य दिसत आहे. व्हायरल होणारे हे सर्व फोटो एआय जनरेटेड आहेत. 

कतरीना विकीचा खास संदेश

7 नोव्हेंबर रोजी कतरीना आणि विकी कौशल या दोघांनी बाळाच्या आगमनाची अधिकृत घोषणा करत इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. " Our bundle of joy has arrived. With immense love and gratitude, we welcome our baby boy. 7th November 2025. Katrina and Vicky"  असं या पोस्टखाली या दोघांनी लिहिलं होतं. घरात छोट बाळ आल्याच्या आनंदानंतर विकीचा भाऊ सनी कौशल्य ही instagram स्टोरी पोस्ट करत ' मी काका झालोय...' अशी पोस्ट केली होती. 

एका पूर्वीच्या मुलाखतीत सनी कौशलने भावाच्या घरात नवीन पाहुण्याचं स्वागत करण्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. तो म्हणाला होता, " पहिल्यांदाच आम्ही सगळे अशा प्रकारच्या आनंदाचा अनुभव घेत आहोत. बाळ कधी येणार आणि आम्ही त्याचे कधी स्वागत करणार याचीच आम्ही वाट पाहत आहोत." काका म्हणून तू कसा असणार असं विचारलं असता सनी हसत म्हणाला होता, "मी एकदम मजेदार काका होणार आहे. बाळाचे लाड करणार. त्याला spoil करणार... तसंच व्हायला मला आवडेल." कतरिना विकी यांनी जरी बाळाचे फोटो शेअर न करण्याचा निर्णय घेतला असला तरी एआयमुळे बनवलेले हे फोटो चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहेत.