Hera Pheri 3 : 'हेरा फेरी' (Hera Pheri 3) हा सिनेमा अशा गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे जो पाहून आजही हसू आवरत नाही. नकळतपणे प्रेक्षक या सिनेमाशी जोडला गेला आहे. या सिनेमाच्या पहिल्या दोन भागांत अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी ही जोडी दिसली होती. या सिनेमातील तिघांच्या भूमिकेने प्रेक्षकांना अगदी भुरळ घातली होती. या सिनेमाचा तिसरा भागही बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, जेव्हापासून अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) जागी कार्तिक आर्यन (Karthik Aryan) अक्षयची जागा घेणार ही बातमी आल्यानंतर चाहत्यांना धक्काच बसला आहे.    

Continues below advertisement

अक्षय नाही तो 'हेरा फेरी 3' नाही

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान, अक्षयने स्वतः 'हेरा फेरी 3' सिनेमा सोडल्याच्या बातमीबद्दल बोलताना सांगितले की, 'जेव्हा हा सिनेमा मला ऑफर करण्यात आला तेव्हा मी त्याच्या स्क्रिप्टवर समाधानी नव्हतो. मला ती स्क्रिप्ट आवडली नाही. आता लोकांना जे पहायचे आहे ते मला करायचे आहे. त्यामुळेच मी हा सिनेमा सोडला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर 'नो अक्षय नो हेरा फेरी 3' ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक निराशा व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "जर परेश रावल हेरा फेरी सीरिजचे हृदय असेल तर #AkshayKumar हा आत्मा आहे आणि आत्म्याशिवाय चित्रपट मृत शरीरासारखा असेल".

Continues below advertisement

 

एका यूजरने लिहिले की, 'अक्षय व्यतिरिक्त राजूच्या भूमिकेत इतर कोणत्याही अभिनेत्याची कल्पना करणे अशक्य आहे'. एकाने लिहिले की, 'हा फक्त एक चित्रपट नाही, तर ते आपल्या सर्वांसाठी एक इमोशन आहे'.

अक्षयच्या एका चाहत्याने सांगितले की, 'चित्रपटातील राजूची आयकॉनिक व्यक्तिरेखा नेहमीच लक्षात राहील. एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे नवीन गोष्टीची सुरुवात.

 

एकाने लिहिले की, 'जेव्हा कोणी म्हणतो की, 'हेरा फेरी 3'मध्ये त्याने अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनला आणले आहे. तेव्हा 'हेरी फेरी 3' मध्ये अक्षय कुमार नसेल तर माझी प्रतिक्रिया अशी असेल.

महत्वाच्या बातम्या : 

Akshay Kumar : ठरलं! 'हेरा फेरी 3'मध्ये अक्षय कुमार दिसणार नाहीच; स्वतः खिलाडी कुमारच म्हणाला,"मी या सिनेमाचा भाग नाही"