Kareena Kapoor Meera Rajput Show: अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. चित्रपटासह अभिनेत्री विविध शोमधून होस्टच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येते. अभिनेत्री लवकरच 'व्हाट वुमेन वांट' (What Women Want) या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येच आहे. यावेळी हा शो खूप धमाकेदार होणार आहे. करीना कपूरचे शो गाजतात. तिने अलिकडेच आपल्या शोमध्ये येणाऱ्या गेस्ट विषयी माहिती दिली. तिच्या शोमध्ये लवकरच अभिनेता शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत (Meera Rajput) दिसणार आहे. यासह अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) देखील या शोमध्ये सहभाग घेतील अशी माहिती समोर आली आहे. करीना कपूर सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिने आपल्या आगामी शोमधील पाहुण्यांची माहिती नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे दिली. सध्या अभिनेत्रीची स्टोरी व्हायरल (Entertainment) होत असून, या शोमध्ये प्रेक्षकांना कोणतं गॉसिप पाहायला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
करीना कपूरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल (Kareena Kapoors host Show what women want on trend)
करीना कपूर सोशल मीडियात सक्रीय असते. तिने अलिकडेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून आपल्या आगामी शोची माहिती दिली. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटोस शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने पंकज त्रिपाठी यांच्यासोबत पोज देत काढलेला फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत, 'पंकज दादांसोबत पाऊट', असं तिने स्टोरीला कॅप्शन दिलं आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री मीरा राजपूत हिच्यासोबत पोज देत फोटो काढले असल्याचं दिसत आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'लव्हली मिरासोबत आजचा शो पडला पार', असं म्हटलं आहे.
या फोटोमध्ये मीरा राजपूतने व्हाइट कलरचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. तसेच लेदर स्कर्ट घातली आहे. तसेच ओपन हेअर्स ठेवून मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे. लाइट मेकअपमध्ये मीरा राजपूत खूप सुरेख दिसत होती. तर, करीना कपूरने लाल रंगाचा टॉप आणि लेदर स्कर्ट घातली असल्याचं दिसत आहे. करीना कपूर खानने मीरा राजपूतसोबतचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. एका युझरने कमेंटमध्ये, 'या कोलॅबबाबत कधी विचारही केला नव्हता', असं म्हटलं आहे. तर, आणखी एका युझरने, 'गॉर्जियस कॉम्बिनेशन', असं म्हटलं आहे. सध्या करीना कपूरची पोस्ट व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, शाहीद कपूर आणि करीना कपूर हे एक्स कपल आहेत. 2004 साली 'फिदा' या चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली. दोघांची जोडी प्रचंड चर्चेत आली होती. पण 2007 साली त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर दोघांनीही आपआपली वाट निवडली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
