Karan Johar On Relationship Status: चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य करत असतो. नुकतच धर्मा प्रोडक्शनमुळे (Dharma Production) करण जौहर चर्चेत आला होता. त्याचप्रमाणे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही करण बराच चर्चेत असतो. नुकतच त्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा नव्या चर्चांना उधाण आलंय. कारण या पोस्टच्या माध्यमातून करणने त्याचं रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
करण जोहरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीवरील लिहिलेल्या कॅप्शनने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टमुळे करण सध्या सिंगल असल्याचं समोर आलं आहे. करण अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निर्भीडपणे भाष्य केलं आहे. आता त्याच्या या मिश्किल पोस्टमुळेही बरीच चर्चा होतेय.
करणची नेमकी पोस्ट काय?
करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मी सध्या इतका सिंगल आहे की मी एका खडकावर उभा राहून ओरडलो की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या प्रतिध्वनीने मला फक्त मित्र बनायचे आहे असं उत्तर दिले.' करणच्या ही मिश्लिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.
'मी खूप दिवसांपासून अविवाहित आहे..'
करण जोहरने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलताना म्हटलं की, मी वयाच्या 40 वर्षातगी जोडीदाराच्या शोधात होतो. पण पन्नाशीनंतर त्याने शोध घेणं बंद केलं. 'मी सिंगल आहे आणि बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये नाही. मी माझ्या आयुष्यात सिंगल लाईफचा खूप आनंद घेतोय. मला नाही वाटत ही आता माझं आयुष्य मी कुणासोबत शेअर करु शकेन. माझ्या मुलांची जबाबदारी आणि माझ्या आईची जबाबदारी आता एवढचं करायचं आहे. करण जोहरने 2017 मध्ये सरोगसीद्वारे दोन मुलांचे स्वागत केले होते. त्यांच्या मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही आहे.