Karan Johar Review Tu Yaa Main Movie: 13 फेब्रुवारीला रिलीज झालेली 'ही' फिल्म पाहून करण जोहरनं घेतला BP च्या औषधांचा एक्स्ट्रा डोस; BO वर ओपनिंग फक्त 55 लाख
Karan Johar Review Tu Yaa Main Movie: बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक असलेल्या करण जोहरनं 'तू या मैं' सिनेमाचा रिव्यू केला आहे. त्यानं मुख्य भूमिकेत असलेल्या शनाया कपूर आणि आदर्श यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

Karan Johar Review Tu Yaa Main Movie: नुकताच रिलीज झालेला शनाया कपूर (Shanaya Kapoor) आणि आदर्श गौरव (Adarsh Gourav) यांचा नवा सिनेमा, 'तू या मैं' (Tu Yaa Main), थिएटरमध्ये रिलीज झालाय. एकीकडे सोशल मीडियावर सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय, तर दुसरीकडे सेलिब्रिटींनीही हा सिनेमा कसा वाटला, याचा रिव्यू शेअर केला आहे. सर्व सेलिब्रिटींमध्ये करण जोहरनं दिलेल्या रिव्यूची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक असलेल्या करण जोहरनं 'तू या मैं' सिनेमाचा रिव्यू केला आहे. करण जोहरनं शनाया कपूरच्या सिनेमाचं वर्णन 'सबसे अच्छे तरीके से ट्रॉमा देने वाला...', असं केलं आहे. त्यानं असंही म्हटलंय की, सिनेमा पाहिल्यापासून तो स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याला असं वाटतंय की, 'मुंबईच्या ट्रफिकच्या मध्ये' मगरी त्याच्यावर हल्ला करू शकतात. त्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक बिजॉय नांबियारसोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शनाया कपूर आणि आदर्श यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
करण जोहरनं केला 'तू या मैं' सिनेमाचा रिव्यू
'तू या मैं'चे पोस्टर शेअर करताना, करण जोहरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "कार्डिओची आवश्यकता नाही. या ट्रॉमेटाइजिंग (सर्वोत्तम प्रकारे) सर्वाइवल क्रोक एज ऑफ द सीटरच्या सेकेंड हाफमध्ये तुम्ही तुमच्या सीटवरुन उड्या मारून उभ्या राहाल..." करण जोहरनं पुढे लिहिलंय की, "तुमच्याकडे या व्हेलेंटाईनला पार्टनर असेल, तर त्यांना 'तू या मैं' पाहण्यासाठी घेऊन जा आणि त्याला आर्मर घालून यायला सांगा, कारण तुम्ही भितीनं त्याला नक्कीच मिठी माराल... मी स्वतः खूप स्ट्रेसमध्ये आहे... फिल्मची 30 मिनट झालीत, मला असं वाटतंय की, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये एक मगर येईल आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला करेल... (मला माहीत आहे की, मी जरा जास्तच ड्रामा करतोय, पण या सिनेमानं मला माझ्या बीपी मेड्सचा अतिरिक्त डोस घेण्यास भाग पाडलंय...)."
View this post on Instagram
'तू या मैं'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
2 तास 30 मिनिटांचा रोमँटिक थ्रिलर, तू या मैं, हा सिनेमा 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, आदर्श गौरव आणि शनाया कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमानं फक्त 55 लाखांचं कलेक्शन केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























