Karan Johar Made a Grand Debut at Met Gala 2026: 2026 च्या मेट गाला (Met Gala2026) या विशेष कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांनी चारचांद लावले. बॉलिवूड सेलेब्रिटींनी  आपली फॅशन सादर केली.  यावर्षी हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता  करण जोहरने मेट गालामध्ये डेब्यू केला. करण  जोहरने कॅरी केलेला क्रिएटिव्ह लूक सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  त्यानं मनीष  मल्होत्रा याने कस्टम केलेला खास डिझायनर आऊटफिट कॅरी केला होता.   जो 'फॅशन आर्ट' या थीमशी अगदी जुळणारा होता. करण जोहरचा हा लूक सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही त्याच्या लूकचं विशेष कौतुक केलं आहे.  त्याचा संपूर्ण लूक भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

करण जोहरच्या आऊटफिटचं विशेष कौतुक (Karan Johar stuns at Met Gala 2026)

करण जोहरचा पोशाख प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या पेंटिग्सपासून प्ररित आहे. कपड्यांमधील डिटेलिंग आणि इमोशन्स ठळकपणे पोशाखातून दिसून येत आहे. या पोशाखाला मॉडर्न आणि स्ट्रक्चर्ड पद्धतीने तयार करण्यात आले आहे.  करण जोहरने Dramatic Cape कॅरी केला आहे.  या Dramatic Capeवर गोल्ड पेटिंग्सही पाहायला मिळत आहे.  Dramatic Capeमध्ये हंस दमयंती, कदंबरी,  अर्जून आणि सुभद्रा यांसारखे  चित्र पाहायला मिळत आहे.   त्याच्या आऊटफिटमध्ये भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. 

मनीष मल्होत्राने आपल्या सुंदर डिझायन केलेल्या पोशाखातून भारतीय चित्रकलेचे जनक राजा रवि वर्मा यांना श्रध्दांजली वाहिली आहे. करणचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.   असं वाटत आहे, जणू  एखादे चित्र जिवंत झाले आहे.  करण जोहरने मेटा गालासाठी केलेल्या खास लूकचे फोटोस इन्स्टाग्राम अकाऊंटर शेअर केले आहे.  त्यानं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की,  'माझा लूक हा राजा रवि वर्मा यांच्या कलेपासून प्रेरित आहे.  मी माझ्या लूकसाठी  राजा रवि वर्मा यांच्याकडून प्रेरणा घेतली.  कारण त्यांची कला ती जादू करते, जे मी माझ्या सिनेमांमध्ये करण्याचा प्रयत्न करतो'.

'राजा रवि वर्मा हे आपल्या पेंटिग्समध्ये भावनांना रेखाटतात.   मनीष मल्होत्राकडे याहून  उत्तम पर्याय असूच शकत नाही.  आपल्या भारतीय संस्कृतीला जागतिक लेव्हलवर घेऊन जाणं, ही देखील एक कला आहे. मला तुम्ही ही कला सादर करण्यासाठी निवडले, यासाठी खूप आभार', असं करण जोहरने  आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...