Jug Jug Jeeyo Controversy : दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) जुग जुग जियो (Jug jugg Jeeyo) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांनी त्यांचं गाणं या चित्रपटामध्ये चोरी केल्याचा आरोप करण जोहरवर केला. तर आता नुकताच एका स्क्रिप्ट रायटरनं देखील करणवर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्या लेखकाचा असा आरोप आहे की, त्यानं लिहिलेलं कथानक चोरी करुन करणनं या चित्रपटाची निर्मिती केली.
विशाल ए सिंह नावाच्या एका ट्विटर युझरनं त्याच्या ट्विटर अकाउंटवर एका ट्वीट शेअर केलं आहे. त्या ट्वीटमध्ये धर्मा कंपनीला शेअर केलेला मेल दाखवण्यात आला आहे. या मेलचा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन विशालनं असा दावा केला आहे की, त्यांनं 2020 मध्ये जुग जुग जियोची स्क्रिप्ट रजिस्टर केली होती. त्यानं धर्मा मूव्हिजला त्यावेळी हा चित्रपट प्रोड्यूस करण्यासाठी मेल केला होता. धर्मा मूव्हिजनं त्या मेलला रिप्लाय देखील दिला होता पण त्यानंतर मला न सांगताच त्यांनी जुग जुग जियो या चित्रपटची निर्मिती केली.
पुढे ट्वीटमध्ये विशालनं लिहिलं, 'जर गोष्ट आवडली तर तुम्ही मला तसं सांगायला पाहिजे होत. आपण एकत्र मिळून चित्रपटाची निर्मिती केली असती. एका प्रसिद्ध बॅनरला असं वागणं शोभत नाही. जर हे माझ्यासोबत होऊ शकते तर हे कोणासोबतही होऊ शकते.'
गायकानं केला होता गाणं चोरल्याचा आरोप
जुग जुग जियो या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये नाच पंजाबन या गाण्याची झलक दिसत आहे. आता एका पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर नाच पंजाबन हे गाणं चोरल्याचा आरोप केला आहे. या पाकिस्तानी गायकाचं नाव अबरार उल हक (Abrar-ul-Haq) असं आहे. या गायकानं केलेल्या आरोपावर टी सीरिज या कंपनीनं उत्तर दिलं आहे.
जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो.
हेही वाचा :