एक्स्प्लोर

कपिल शर्माच्या शो मधील रिंकी आणि चिंकी या जुळ्या बहिणी वेगळ्या होणार, दोघींच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Kapil Sharma Show fame Chinky and Minky : कपिल शर्माच्या शो मधील रिंकी आणि चिंकी या जुळ्या बहिणींनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी इन्स्टाग्रामवर याबाबतची घोषणा केलीये.

Kapil Sharma Show fame Chinky and Minky : सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या जुळ्या बहिणी चिंकी आणि मिंकी यांनी अधिकृतरीत्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक चाहते चकित झाले आहेत. 3 जुलै 2025 रोजी दोघींनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर ही माहिती शेअर केली. आता पुढे त्या दोघी स्वतंत्रपणे काम करतील. ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक ठरली, कारण चिंकी आणि मिंकी या इंस्टाग्रामवर 12 मिलियन फॉलोअर्स असलेल्या लोकप्रिय सोशल मीडिया स्टार्स आहेत.

चिंकी आणि मिंकीचा जन्म डिसेंबर 1998 मध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे एका मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबात झाला होता. या बहिणींनी दिल्लीतील माउंट आबू सीनियर सेकंडरी पब्लिक स्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले. सुरभी आणि समृद्धी (खऱ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) या दोघींना अभिनयाची आवड वयाच्या 10 व्या वर्षांपासून  लागली होती. शालेय जीवनात त्यांनी नाटकं आणि थिएटरमध्ये भाग घेऊन अभिनयाची सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कॉलेज ऑफ व्होकेशनल स्टडीज मधून पदवी घेतली असून पुढील शिक्षण पुण्यातील सिम्बायोसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीमध्ये घेतले. अभिनय, मॉडेलिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी त्यांनी सुरुवातीचं खाजगी नोकरीचं करिअर सोडून दिलं. चिंकी आणि मिंकी 2019 मध्ये द कपिल शर्मा शो मध्ये झळकल्या आणि तिथूनच त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोजमध्ये शेजारीण म्हणून काम केलं आणि पिया पिया ओ पिया या गाण्यावर केलेल्या परफॉर्मन्समुळे प्रेक्षकांची मनं जिंकली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinki Minki♥️ (@surabhi.samriddhi)

सुरभी आणि समृद्धी यांना चाहते खूपच आवडतात. त्यांनी TikTok बंद झाल्यानंतर या जुळ्या बहिणींनी Instagram वर कंटेट शेअर करण्यास सुरुवात केली होती.  इथेही दोघींनी आपल्या व्हिडिओजद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांना कॉलेज रोमांस आणि हीरो: गायब मोड ऑन या मालिकांमध्येही पाहिलं गेलं आहे. 2022 मध्ये त्यांनी ट्विंटरव्यू नावाच्या शोचं सूत्रसंचालन केलं, ज्यामध्ये त्यांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलाखत घेतली.

त्यांची एकत्रित एकूण संपत्ती सुमारे 1.5 ते 3 मिलियन डॉलर्स दरम्यान असल्याचा अंदाज आहे, म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे 12 ते 25 कोटींच्या आसपास. त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत म्हणजे ब्रँड डील्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, यूट्यूब, विविध कार्यक्रमांमधील हजेरी, गाड्या व मालमत्ता. दोघींनी 2024 मध्ये सुकून नावाचं घर विकत घेतलं होतं.

People AI च्या माहितीनुसार, समृद्धीची स्वतंत्र संपत्ती सुमारे 1 कोटी रुपये आहे, तर सुरभीची संपत्ती लाखोंच्या घरात आहे. 3 जुलै 2025 रोजी दोघींनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला, ज्यात त्यांनी ‘जोडी’ म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं उघड केलं.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

21 वर्षात 4 वेळा हनुमानाची भूमिका साकारली, कधीकाळी होता पैलवान, राज्यसभेचा खासदार म्हणूनही काम

'तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण..', निलेश साबळे अन् शरद उपाध्येंच्या वादात आणखी एका अभिनेत्याची उडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Suspence Thriller on OTT: 3 महिन्यांपासून ट्रेंड करतेय ही खतरनाक थ्रिलर; फक्त 7 एपिसोड्सच्या सिरीजला IMDb वरही टॉप रेटिंग
3 महिन्यांपासून ट्रेंड करतेय ही खतरनाक थ्रिलर; फक्त 7 एपिसोड्सच्या सिरीजला IMDb वरही टॉप रेटिंग
Bigg Boss Marathi 6: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकावर एलिमिनेशनची टांगती तलवार?
फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट; वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या स्पर्धकावर एलिमिनेशनची टांगती तलवार?
Hridaynath Mangeshkar: प्रकृती बरी नसल्याने मुंबईत अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही; ह्रदयनाथ मंगेशकरांनी मनातील खंत सांगितली, बहिणीसाठी डोळ्यात अश्रू
प्रकृती बरी नसल्याने मुंबईत अंत्यसंस्कारासाठी जाता आलं नाही; ह्रदयनाथ मंगेशकरांनी मनातील खंत सांगितली, बहिणीसाठी डोळ्यात अश्रू
Splitsvilla: 'स्प्लिट्सव्हिला'मध्ये भयंकर घडलं; 2 तरुणींमध्ये राडा, हिल्सनं मारलं, ओठातून रक्त वाहू लागलं; सनी लिओनी नाराज
'स्प्लिट्सव्हिला'मध्ये भयंकर घडलं; 2 तरुणींमध्ये राडा, हिल्सनं मारलं, ओठातून रक्त वाहू लागलं; सनी लिओनी नाराज

व्हिडीओ

Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Kolhapur Babasaheb Ambedkar Statue : बाबासाहेब हयात असताना कोल्हापुरात उभरलेला पुतळा Special Report
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
बदलापूरच्या पत्रकारांसाठी नगरपालिकेत कक्ष देणार; डिजिटल पत्रकार संघटनेच्या सोहळ्यात नगराध्यक्षा घोरपडेंचा शब्द
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 एप्रिल 2026 | मंगळवार
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
Embed widget