Kapil Sharma I'm Not Done Yet : कॉमेडी किंग म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) प्रेक्षकांना त्याच्या विनोदी शैलीनं खळखळून हसवतो. कपिलचा  'कपिल शर्मा: आय एम नॉट डन येट' (Kapil Sharma : I Am Not Done Yet) हा नेटफ्लिक्सवरील (Netflix) नवा शो  प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या शोमध्ये कपिल वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतो. नुकताच कपिलनं  'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सिझन 3'  (The Great Indian Laughter Challenge Season 3)  या शो संबंधित एक अनुभव सांगितला.  


कपिलनं सांगितलं,'मी  लाफ्टर चॅलेंज सिझन 3 हा शो जिंकला. माझ्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण होता. मी दहा लाख रूपये जिंकले. अनेक वेळा आपण स्वत:ला कमी समजतो. मी असा विचार केला होता की यापेक्षा जास्त आपण काहीच करू शकत नाही. मी मिळालेला दहा लाख रूपयांचा चेक हा माझ्या अमृतसर येथील घरात फ्रेममध्ये लावला होता. पण जेव्हा मी तो चेक घेऊन बँकमध्ये गेलो तेव्हा मला कळाले की मला या चेकमधील केवळ  6,90,000 रुपये मिळणार आहेत. माझे 3,10,000 कट झाले होते. मला चॅनलच्या टीमवर प्रचंड राग आला होता. मी त्यांना विचारले की बाकीचे पैसे कुठे गेले तर त्यांनी सांगितले की टीडीएस कट झाला आहे. '






पुढे कपिल म्हणाला, 'मी त्या टीमला विचारलं की तुम्हाला हे पैसे कट करायला कोणी सांगितलं. तर त्यांनी मला सांगितलं की असं कोणी सांगायची गरज नसते ते पैसे कट होत असतात. मी रागात त्यांना म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत असं का केलं?'


संबंधित बातम्या


Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...


Kapil Sharma I Am not Done Yet : कॉमेडी किंग कपिल शर्माला आले होते डिप्रेशन; सांगितला अनुभव


Divyanka Tripathi : दिव्यांका त्रिपाठीनं सांगितला 'कास्टिंग काउच' चा अनुभव; म्हणाली...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha