Kantara Chapter 1 Box Office Collection Day 6: ऋषभ शेट्टी (Rishab Shetty)च्या 'कांतारा चॅप्टर 1'नं बॉक्स ऑफिसवरची आपली पकड आणखी घट्ट केली आहे. सध्या ऋषभ शेट्टी दिग्दर्शित सिनेमा बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवत आहे. होम्बाले फिल्म्स निर्मित, मूळ कन्नड चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1'चा ओपनिंग वीकेंड चांगला होता आणि विकडेजमध्येही हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे. सोमवारी दमदार ओपनिंगनंतर, 'कांतारा चॅप्टर 1'नं मंगळवारी, रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1'नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?

'कांतारा चॅप्टर 1'नं बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची जादू प्रेक्षकांना भुरळ घालतेय आणि आठवड्याच्या दिवशीही प्रेक्षक तो पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं थिएटरमध्ये येत आहेत. 125 कोटी खर्च करुन बनवलेल्या या चित्रपटानं आधीच निर्मात्यांच्या तिजोरीत पैसे भरले आहेत, फक्त सात दिवसांत त्याच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. 'कांतारा चॅप्टर 1'ला मिळत असलेल्या प्रतिसादावरून असं स्पष्ट होतंय की, 'कांतारा चॅप्टर 1' आता बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडण्याच्या तयारीत आहे.

'कांतारा चॅप्टर 1'च्या कलेक्शनबाबत बोलायचं तर, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'कांतारा चॅप्टर 1'नं मंगळवारी 33.5 कोटी रुपये कमावले. यासोबतच 6 दिवसांत एकूण कमाई 290.25 कोटी रुपये झाली आहे.                             

Continues below advertisement

'कांतारा चॅप्टर 1'ची सहा दिवसांची कमाई 

दिवस  कमाई (कोट्यवधींमध्ये)
दिवस पहिला 61.85 कोटी 
दिवस दुसरा 45.4 कोटी 
दिवस तिसरा 55 कोटी 
दिवस चौथा 63 कोटी 
दिवस पाचवा 31.5 कोटी 
दिवस सहावा 33.5 कोटी 
एकूण कलेक्शन  290.25 कोटी 

'कांतारा चॅप्टर 1' 300 कोटींपासून किती दूर?

'कांतारा चॅप्टर 1' सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतोय. प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांतच या चित्रपटानं 290.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि 125 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. आता तो चित्रपट 300 कोटी रुपयांपासून फक्त 10 कोटी रुपयांनी दूर आहे. बुधवारी हा चित्रपट हा टप्पा ओलांडून हा जादुई आकडा गाठेल, अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, 'कांतारा चॅप्टर 1' 2022 चा हिट कन्नड सिनेमा 'कांतारा' चा प्रीक्वल आहे. या चित्रपटात ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांच्या भूमिका आहेत. मूळ कथेच्या हजार वर्षांपूर्वीची ही कथा कंताराच्या लोकांच्या स्वायत्ततेसाठी लढणाऱ्या बर्मे (ऋषभ) वर केंद्रीत आहे.