Kannada and Tamil TV actor Nandini CM News: टेलिव्हिजनची (Television Actress) सुपरस्टार अभिनेत्री नंदिनी सीएम (Actress Nandini CM) हिनं बंगळुरूमध्ये (Bangluru) आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीनं अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानंतर संपूर्ण कन्नड आणि तमिळ टेलिव्हिजन विश्वात (Kannada and Tamil Television World) खळबळ माजली आहे. नंदिनी सीएम (Nandini CM) हिने बंगळूरमधील (Bangluru) तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आयुष्य संपवण्याचा निर्णय घेण्यामागचं धक्कादायक कारणंही अभिनेत्रीनं सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. आई वडिलांना उद्देशून लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीनं, तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जात होता आणि ती त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, असं लिहिलंय. तसेच, इतर काही कारणांमुळे देखील ती नैराश्यात होती, असा उल्लेखही अभिनेत्रीच्या सुसाईड नोटमध्ये आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री नंदिनी सीएम एका सीनचं शूट करत होती. त्यावेळी एका डेथ सीनचं शूट सुरू होतं, त्यानंतर काही वेळातच अभिनेत्रीनं आपलं आयुष्य संपवलं. लाडक्या अभिनेत्रीनं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे चाहते पुरते हादरले आहेत.
कन्नड आणि तमिळ टेलिव्हिजन अभिनेत्री नंदिनी सीएम 'जीव हुवागीडे', 'संघर्ष' आणि 'गौरी' सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली. या टीव्ही शोमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री बंगळुरूमध्ये राहत होती. ही घटना बंगळुरूच्या आरआर नगरमध्ये घडल्याची माहिती मिळत आहे.
मालिकेतल्या डेथ सीनप्रमाणे नंदीनं आयुष्य संपवलं?
धक्कादायक बाब म्हणजे, अलिकडेच नंदिनीनं काम केलेल्या 'गोवरी'या मालिकेतील तिच्या पात्रानं विष प्राशन केलंय, असा प्रसंग चित्रित करण्यात आला होता. अगदी त्याच पद्धतीनं नंदिनीनं आपलं जीवन संपवलं का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तिच्या पडद्यावरील भूमिकेचा तिच्या मृत्यूशी कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तपास पुढे सरकल्यावर अधिक माहिती दिली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
त्या संध्याकाळी नंदिनी तिचा मित्र पुनीतच्या घरी गेली होती. नंदीनीच्या मृत्यूच्या कारणाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी घटनेच्या कारणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 28 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:16 ते 29 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 12:30 च्या दरम्यान ही दुःखद घटना घडल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नंदिनी त्या संध्याकाळी तिचा मित्र पुनीतच्या घरी गेली होती आणि रात्री 11:23 च्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील तिच्या खोलीत परतली आणि तिनं आतून दरवाजा बंद केला. पुनीतनं तिला फोन केला तेव्हा तो तिच्याशी संपर्क साधू शकला नाही. यामुळे तो चिंतेत पडला आणि त्यानं पीजी मॅनेजर कुमार आणि प्रभारी किरण यांना कळवलं. दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना नंदिनी तिच्या खोलीत लटकलेली आढळली. केंगेरी पोलिसांना कळवण्यात आलं आणि बल्लारीहून बंगळुरूला आलेल्या तिच्या कुटुंबाला कळवण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
