Kannada Priest Narasimha Murthy Makes Industrys First AI Feature Film: कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूजवळील (Bangalore) सिद्धेहल्ली गावातील एका पुजाऱ्यानं असं काही केलंय, जे पाहून फक्त साऊथ इंडस्ट्रीच (South Industry) नाहीतर संपूर्ण बॉलिवूडमध्येही (Bollywood) खळबळ माजली आहे. पुजाऱ्यानं आपल्या कृत्यानं कन्नड चित्रपट (Kannada Movies) उद्योगाला गौरवशाली दिवस दाखवला आहे. एकीकीडे, दक्षिण चित्रपटसृष्टीतील मोठ्या बजेटचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) अपयशी ठरत आहेत. नरसिंह मूर्ती (Narasimha Murthy) नावाच्या एका पुजाऱ्यानं फक्त 10 लाख रुपये खर्च करून आणि 6 महिने कठोर परिश्रम करून एक अनोखा चित्रपट बनवला आहे.
पुजाऱ्यानं बनवलेल्या चित्रपटात कोणताही अभिनेता नाही, संगीत दिग्दर्शक नाही आणि कोणताही प्रोडक्शन हाऊसचा क्रू मेंबरही नाही. नरसिंह मूर्ती यांनी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच, एआय वापरून सर्व काही केलं आहे. हा सँडलवुडचा पहिला एआय-जनरेटेड चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय.
नरसिंह मूर्तींसाठी 'लव्ह यू' हा चित्रपट त्यांचं स्वप्न होतं. हे साध्य करण्यासाठी, त्यांनी नूतन नावाच्या एका एआय टेक्निशियनची मदत घेतली, जी पूर्वी ग्राफिक डिझायनर होती. या 95 मिनिटांच्या एआय कन्नड चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) नं यू/ए प्रमाणपत्रासह प्रदर्शित होण्यास मान्यता दिली आहे.
30 AI टूल्स वापरून बनवला चित्रपट
नरसिंह आणि नूतन यांच्या या दोन सदस्यांच्या टीमनं एआयच्या मदतीनं चित्रपटातील कलाकार, साउंडट्रॅक आणि व्हिज्युअल्सपासून सर्वकाही डिझाइन केलं आहे. यामध्ये ड्रोन शॉट्सचाही समावेश आहे. 'लव्ह यू' हा चित्रपट सहा महिन्यांत 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये पूर्ण झाला आहे. यासाठी 30 वेगवेगळ्या एआय टूल्सचा वापर करण्यात आला. चित्रपटाच्या बजेटचा मोठा भाग एआय सॉफ्टवेअर परवान्यासाठी खर्च झाला आहे.
एआय वापरून बनवलेल्या 'लव्ह यू' चित्रपटात 12 गाणी
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना नरसिंह मूर्ती म्हणाले की, त्यांना 'जगातील पहिला एआय फीचर फिल्म' बनवायचा आहे आणि तो थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा आहे. त्यांचा प्लॅन फक्त तो मोठ्या पडद्यावर दाखवून एक विक्रम रचण्याचा आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे, या 95 मिनिटांच्या कन्नड चित्रपटात 12 गाणी आणि संवाद एआयनं तयार केले आहेत. दरम्यान, त्यांनी स्वतः गाणी आणि डायलॉग्स लिहिले आहेत.
जगातील पहिली AI फीचर फिल्म 2024 मध्ये बनवण्यात आलेली
दरम्यान, 'लव्ह यू' ही जगातील पहिला एआय-जनरेटेड फीचर फिल्म नाही. यापूर्वी 2024 मध्ये 'व्हेअर द रोबोट्स ग्रो' नावाचा एआय चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नरसिंह यांनी सेन्सॉर बोर्डाकडून मिळालेल्या अभिप्रायाबद्दलही सांगितलं आणि म्हणाले की, 'प्रादेशिक सेन्सॉर अधिकाऱ्यांनी पात्रांमधील दृश्यानुसार समन्वय साधण्याची समस्या देखील निदर्शनास आणून दिली. या पात्रांवर भावनिक दृश्य निर्माण करणं, हे एक आव्हान होतं आणि त्याचप्रमाणे लिप-सिंकिंग देखील एक आव्हान होतं. सेन्सॉर बोर्डानं आमच्या महत्त्वाकांक्षा आणि नाविन्याचं कौतुक केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :