Kannada Actor Producer Dileep Raj Died: सिनेसृष्टी (Film Industry) पुन्हा एकदा हादरली असून दुखःचा डोंगर कोसळला आहे. आरबी चौधरी (RB Choudary), त्यापाठोपाठ भारत कांत (Bharath Kanth) आणि आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील (South Film Industry) प्रसिद्ध अभिनेता (Actor) आणि निर्मात्यानं (Producer) जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कन्नड अभिनेते आणि निर्माते दिलीप राज (Kannada Actor And Producer Dilip Raj) यांचं निधन झालं. बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अभिनेत्यानं (Actor Dilip Raj Passes Away) अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याला अचानक कार्डियाक अरेस्ट आला. त्यानंतर त्यांना तातडीनं बंगळुरू येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, अखेर अभिनेते आणि निर्माते दिलीप राज यांचं निधन झालं.
प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानं कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्यांनी, चाहत्यांनी आणि दिलीप राज यांच्या मित्रमंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अभिनेता चेतन कुमार यानं ट्विटरवर लिहिलंय की, "प्रतिभावान कलाकार दिलीप राज यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाल्याची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झालंय. 2009 मध्ये गोव्यामध्ये एका गाण्याचं शुटिंग सुरू असताना, मी राज यांच्यासोबत काम केलेलं. ते अत्यंत कल्पक, दयाळू आणि मनमिळाऊ व्यक्ती होते. एक डबिंग कलाकार म्हणून माझ्या पात्रांमध्ये जीव ओतल्याबद्दल मी त्यांचा विशेष ऋणी आहे. ते सदैव आठवणीत राहतील..."
दिलीप राज यांच्याबाबत थोडसं... (Who Is Dilip Raj?)
2 सप्टेंबर 1978 रोजी जन्मलेले दिलीप राज यांनी दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी आणि निर्मिती क्षेत्रातील आपल्या कामाद्वारे कन्नड मनोरंजन विश्वात एक प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकीर्द घडवली. दूरदर्शनवर लोकप्रियता मिळण्यापूर्वीच, रंगभूमीवरील आणि नाट्यनिर्मितींमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे ते सर्वत्र नावाजले जात असत. गेल्या काही वर्षांत, विविध माध्यमांतून अविस्मरणीय भूमिका साकारत त्यांनी आपला एक मोठा चाहतावर्ग निर्माण केला.
हा अभिनेता अलीकडेच 'मॉकटेल 3' (Mocktail 3) या सिनेमात दिसला होता. या सिनेमात प्रेक्षकांनी त्याच्या उत्कृष्ट अभिनयाचं आणि त्याच्या नव्या लूकचंही भरभरून कौतुक केलेलं. सिनेमांव्यतिरिक्त, 'कंबाडा माने' (Kambada Mane) आणि 'जननी' (Janani) यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठीही ते विशेष ओळखलं जात असत. कन्नड चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आजही त्यांचे चाहते आणि सहकारी यांच्याकडून अत्यंत आदरानं आणि प्रेमानं आठवण काढली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
