Kanguva Editor Nishad Yusuf Dead: मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्री शोककळा पसरली आहे. 'कांगुवा' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एडिटर निशाद युसूफ यांचे निधन झालं आहे. बुधवारी सकाळी एडिटर कोची येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, एडिटर निशाद युसूफ यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निशाद युसूफ यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जनरल हॉस्पिटलमध्ये पाहठवण्यात आला आहे.
निशाद युसूफ यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा
निशाद युसूफ यांच्या निधनानं मल्याळम चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ केरळ (FEFKA) डायरेक्टर्स युनियननं निशादच्या मृत्यूची पुष्टी करताना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिलं की, 'मल्याळम सिनेमाच्या कंटेम्पररी फ्यूचर ठरवण्यात निशाद युसूफनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचं आकस्मिक निधन झालं, जे चित्रपटसृष्टी लवकर स्वीकारू शकणार नाही. एफईएफकेए डायरेक्टर्स युनियनच्या वतीनं निशाद यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करत आहोत. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
अभिनेता सूर्याची पोस्ट
अभिनेते सूर्यानं वाहिली श्रद्धांजली
निशाद युसूफच्या निधनानंतर 'कांगुवा' चित्रपटाच्या स्टारकास्टला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सूर्यानं त्याच्या एक्स हँडलवर निशादचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, 'निशाद आता आमच्यात नाही हे ऐकून मन दुखावतंय. टीम कांगुवाची एक शांत आणि महत्त्वाची व्यक्ती म्हणून तुझी नेहमी आठवण येईल. आमच्या विचारात आणि प्रार्थनेत तू कायम असशील... निशादच्या कुटुंबीयांना आणि मित्रांसाठी मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. रेस्ट इन पीस. त्यामुळे चाहतेही सूर्याच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत आणि निशादला श्रद्धांजली वाहतात. सूर्या आणि बॉबी देओल स्टारर चित्रपट 'कुंगवा' बॉक्स ऑफिसवर 14 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बॉबी देओल निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :