Kangana Sharma Revealing Dress: अभिनेत्री कंगना शर्मा (Kangana Sharma) म्हणजे, बिनधास्त अन् बोल्ड. ती जेवढी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते, तेवढीच ती तिच्या क्लासी, पण बोल्ड ड्रेसेसमुळे चर्चेत असते. कंगना शर्मानं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी वेअर केलेला रिविलिंग ड्रेस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला. अशातच आता पुन्हा एकदा कंगना शर्मा तिच्या रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत आली आहे.
अलिकडेच कंगना शर्मा पुन्हा एकदा पापाराझींसमोर एक रिव्हिलिंग ड्रेस घालून फ्लॉन्ट करताना. पण यावेळी लोकांना कंगनाचा लूक अजिबात आवडला नाही. ज्यामुळे तिला आता सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. अभिनेत्रीचे कपडे पाहून युजर्सनी तिच्यावर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.
कंगनानं फ्लॉन्ट केला रिव्हिलिंग ड्रेस
खरंतर, कंगना शर्माला नुकतंच एका कार्यक्रमात पापाराझींनी पाहिलं. यादरम्यान तिनं पापाराझींसमोर अनेक पोझही दिल्या. अभिनेत्रीनं डार्क पिंक कलरचा फ्रंट कट ड्रेस घातला होता. जो एरव्हीपेक्षा जास्तच रिविलिंग होता. ड्रेससोबत केलेला मेकअप सुंदर होता. तसेच, तिनं तिचा लूक मोकळ्या केसांनी पूर्ण केला आहे. पण, सोशल मीडिया युजर्सना कंगनाचा हा लूक अजिबात आवडला नाही. आणि त्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं. तसेच, तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
नेटकऱ्यांकडून कंगनावर टीकेची झोड
कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स जोरदार कमेंट करत आहेत आणि अभिनेत्रीला फटकारताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, "कपडे काढण्याची स्पर्धा सुरू आहे." दुसऱ्यानं लिहिलंय की, "ग़रीब को कपड़े नहीं, अमीर नंगे घूम रहे". याशिवाय, एका युजरनं असंही म्हटलंय की, अशा लोकांनी मुंबई उद्ध्वस्त केली आहे.
दरम्यान, कंगना शर्मानं 2016 मध्ये 'ग्रेट ग्रँड मस्ती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच, याव्यतिरिक्त तिनं 'द कपिल शर्मा शो' आणि 'तू सूरज मैं सांझ पिया जी' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. अशातच बऱ्याच काळापासून ती रुपेरी पडद्यापासून लांब आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :