Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौतने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि ती मंडी मतदारसंघातून खासदार झाली. मात्र, तिला आता खासदारकीची जबाबदारी स्वीकारून एक वर्ष झाले असून तिने या प्रवासाविषयी आत्मपरीक्षण केले आहे. Times Now ला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वर्ष काही कठोर वास्तवांचा सामना करत गेले असल्याचे सांगितले.


कंगनाने सांगितले की, सुरुवातीला तिला वाटले की खासदाराचे काम सोपे असेल. “मला नैसर्गिकरित्या हे काम इतके कठीण आणि मागण्या करणारे असेल असे वाटले नव्हते,” असे ती म्हणाली. “जेव्हा मी खासदार झाले, तेव्हा सांगितले गेले की तुम्हाला कदाचित वर्षातून 60–70 दिवस संसदेत उपस्थित राहावे लागेल, उर्वरित वेळात तुम्ही तुमचे इतर काम करू शकता — मला ते वाजवी वाटले. पण हे काम खूपच मागण्या करणारे आहे.”


कंगनाने खासदारपद स्वीकारल्यापासून आजवर केवळ एकच चित्रपट – Emergency – प्रदर्शित झाला आहे. तो चित्रपटही जुलै 2024 पूर्वीच शूट व तयार झाला होता. ती सध्या कोणत्याही नव्या प्रकल्पात सहभागी झालेली नाही, पण लवकरच ती तिच्या पहिल्या हॉलीवूड चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता आहे.


तिने हिमाचल प्रदेशातील मंडी या ‘कठीण’ मतदारसंघातील आव्हानांबाबतही सांगितले. “खूपदा लोक अशा समस्या घेऊन येतात, ज्या माझ्या अधिकारात नसतात, पण मी त्यांना नकार देऊ शकत नाही आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन द्यावेच लागते,” असे ती म्हणाली.


कंगनाने आणखी स्पष्ट केले की, “आपण राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातील दुवा आहोत. केंद्राकडून राज्यासाठी योजना आणणे आणि मतदारसंघातील समस्या केंद्रापर्यंत पोहोचवणे हीच आपली भूमिका आहे,” तसेच तिने सांगितले, “माझ्याकडे ना कोणते मंत्रिमंडळ आहे ना नोकरशाही. मी केवळ जिल्हाधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेऊ शकते आणि त्यानंतर अभिप्राय देऊ शकते.”


कंगनावर टीकेचा भडिमार


कंगनाच्या या वक्तव्यांवरून ती सध्या टीकेचा सामना करत आहे. हिमाचल प्रदेशचे महसूल व बागायती मंत्री जगत सिंग नेगी यांनी गुरुवारी म्हटले की, जर कंगना राणावत आपल्या खासदारपदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना समाधानी नसेल, तर तिने तात्काळ राजीनामा द्यावा.


कंगनाने रविवारी मंडी जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त भागाच्या दौऱ्यात म्हटले होते की, “आपत्ती निवारण व पुनर्बांधणीचे काम हे राज्य सरकारचे आहे, आणि खासदार म्हणून मी फक्त पंतप्रधान व गृह मंत्र्यांना परिस्थितीची माहिती देऊ शकते आणि केंद्राकडून मदत मागू शकते.” 30 जून ते 1 जुलैच्या रात्री मंडी जिल्ह्यात आलेल्या दहा ढगफुटींमुळे आलेल्या पूर व भूस्खलनात 15 लोकांचा मृत्यू झाला, पाचजण जखमी झाले असून 27 जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर शोध व बचावकार्य सुरू आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


रामायणममधील सीतेच्या भूमिकेसाठी किती मानधन घेतलं? साई पल्लवीची एकूण संपत्ती किती कोटी? आकडा ऐकून डोळे विस्फारतील