Kangana Ranaut Slams Karan Johar  धर्मा प्रोडक्शन या निर्मिती संस्थेअतर्गत साकारल्या जाणाऱ्या 'दोस्ताना 2 या चित्रपटातून कार्तिक आर्यनची एक्झिट झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. ज्यानंतर कलाविश्वात अनेक चर्चांनी जोरही धरला. यातच अभिनेत्री कंगना रनौतनं करण जोहरला निशाण्यावर घेत सुशांतप्रमाणे आता कार्तिकलाही गळफास घेऊन आत्महत्या करायला भाग पाडू नकोस अशा बोचऱ्या शब्दांत त्याच्यावर टीका केली. 


'कार्तिक इथवर त्याच्या बळावर पोहोचला आहे. स्वत:च्याच बळावर तो असाच पुढे जात राहील. पापा जो (करण जोहर) आणि त्यांच्या नेपो (नेपोटीझम) गँगला मी एकच विनंती करु इच्छिते की त्याला एकटं सोडा. सुशांतप्रमाणे त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, गिधाडांनो सोडा त्याला एकटं... निघून जा इथून तुम्ही...', असं ट्विट कंगनानं केलं. 


कार्तिक तू यांना घाबरू नकोस, असं म्हणत धर्मा प्रोडक्शन, करण जोहर आणि कलाविश्वात होणाऱ्या घराणेशाहीला धारेवर धरत कंगनाने या कथित प्रतिष्ठीत मंडळींना धारेवर धरलं. सुशांतच्या बाबतीतही यांनी असंच करत तो अमली पदार्थांच्या आहारी असल्याचं आणि त्याच्या गैरवर्तणुकीच्या अफवा पसरवण्याचं काम केलं होतं ही बाब अधोरेखित केली.


स्वत:वर विश्वास ठेव, यावेळी आम्ही तुझ्याच सोबत आहोत असा विश्वास तिनं कार्तिकला देऊ केला. कलाविश्वातील या घडामोडीमुळं सध्या पुन्हा एकदा घराणेशाही, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे मुद्दे चर्चेचा विषय ठरत आहेत. 


करन जोहर आणि कार्तिक आर्यनचा 'दोस्ताना' तुटला! कार्तिकला सिनेमातून काढलं, कधीच काम न देण्याचा निर्णय!  




नेमकं काय घडलं? 


धर्मा प्रोडक्शनशी संबंधित एका व्यक्तिनं एबीपी न्यूजला माहिती देत सांगितलं की, करण जोहरनं कार्तिक आर्यनला 'दोस्ताना 2' मधून बाहेर काढलं आहे. तसंच भविष्यात  कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.  


'दोस्ताना 2'मध्ये लीड रोल मिळालेल्या कार्तिक आर्यनला सिनेमातून का काढलं? याबाबत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं की, 'कार्तिक आर्यनची अनप्रोफेशनल वागणूक आणि सिनेमाच्या  स्क्रिप्टवरुन झालेले मतभेद याला कारणीभूत आहेत. 


सूत्रांनी सांगितलं की, "कार्तिक आर्यनला दीड वर्षांनंतर 'दोस्ताना 2' च्या स्क्रिप्टमध्ये उणिवा दिसू लागल्या. त्यात बदल करावे अशी त्याची इच्छा होती. कार्तिकच्या अशा वागणुकीमुळं  धर्मा प्रोडक्शनने त्याच्यासोबत यापुढे कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.