Kangana Ranaut-Hrithik Roshan: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 'We Owe Hrithik Roshan an Apology' या ट्रेंडवर हृतिकने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनाने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी तिने हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद (Saba Azad) हिचाही उल्लेख करत टीका केली आहे.

Continues below advertisement

अलीकडेच कंगना रणौतने विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर Gen Z पिढीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर तिचे जुने व्हिडिओ, मीम्स आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. याच दरम्यान 'We Owe Hrithik Roshan an Apology' हा ट्रेंड सुरू झाला. या ट्रेंडवर हृतिकने प्रतिक्रिया दिल्यानंतर कंगनाने त्याला प्रत्युत्तर दिले.

'तुम्ही कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात, अशा प्रकारे महिलेला टोमणे मारणं योग्य नाही': कंगना

Continues below advertisement

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "प्रिय हृतिक, तुला तुझी योग्य जोडीदार मिळाली याचा आनंद आहे. तू आणि सबा आझाद एकत्र खूप छान दिसता. तुम्ही एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहात. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेची अशा प्रकारे खिल्ली उडवणं तुला शोभत नाही. त्याऐवजी तुझ्या नावाचा वापर करून मला ट्रोल आणि बुली करणाऱ्यांचा निषेध करायला हवा."

'तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असं वागू नको'

कंगना पुढे म्हणाली, "आगीत तेल ओतणं थांबव आणि तुझ्या पार्टनरला लाज वाटेल असं वागू नका. तुला योग्य गोष्ट समजेल आणि विनाकारण बोलणं थांबवशील, अशी आशा आहे." यासोबतच तिने हृतिकने 'सॉरी हृतिक' ट्रेंडवर प्रतिक्रिया दिल्याबाबतचा एका वृत्ताचा स्क्रीनशॉटही शेअर केला.

'हृतिकची माफी मागा' ट्रेंड कसा सुरू झाला?

दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थी आंदोलन संपलं असलं, तरी त्यानंतर सुरू झालेला राजकीय आणि सोशल मीडियावरील वाद आता नव्या टप्प्यात पोहोचला आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आणि 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रवक्ते सौरव दास यांच्यात शाब्दिक चकमक कंगनाने जेन झींना ‘गटर जनरेशन’ म्हटल्यानंतर सौरव दासने तिच्या या वक्तव्यावर सौरव दास यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "माझे मित्र मला सांगतात की, मी तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखा दिसतो. बहुतेक म्हणूनच कंगना माझ्यावर टीका करत आहे," अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

सौरव दास यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांनी याचा संबंध कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील जुन्या वादाशी जोडला. आणि नंतर अपोलॉजी ट्रेंड सुरू झाला.

हृतिकची प्रतिक्रिया काय होती?

या ट्रेंडवर इन्फ्लुएंसर फ्रेडी बर्डीने पोस्ट शेअर केली होती. त्यावर हृतिकने प्रतिक्रिया देत लिहिलं, "फक्त आता तुम्हाला 'B' आवडत नाही म्हणून 'A'ची बाजू घेणं, ही आपल्या समाजातील मोठ्या समस्येचा एक छोटासा भाग आहे. योग्य संदर्भ आणि तथ्यांसह चर्चा होईल, त्या दिवसाची मी वाट पाहीन. पण आता त्याची कोणाला पर्वा आहे?"हृतिकच्या याच प्रतिक्रियेवर कंगना रणौतने आता सोशल मीडियावरून पलटवार केला आहे.

2016 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

2016 मध्ये कंगना रणौतने हृतिक रोशनवर तिचा पाठलाग केल्याचा आणि तिला त्रास दिल्याचा आरोप केला होता. तसेच त्याच्याविरोधात मानहानीचाही दावा दाखल केला होता. कंगनाचा दावा होता की, ती आणि हृतिक रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, हृतिकने हे आरोप फेटाळले होते. या वादाने पुढे कायदेशीर स्वरूप घेतले. तपासादरम्यान हृतिकने आपला पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासासाठी जमा केली होती. तर कंगनाने तिची उपकरणे पाण्यामुळे खराब झाल्याचे सांगत ती तपास यंत्रणेकडे जमा केली नव्हती.