Kangana Ranaut : महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर (Maharashtra Assembly Election Results 2024) दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे कल हाती येताच सर्व स्तरातून प्रतिक्रियांची सरबत्ती सुरु झाली आहे. निकालांचे कौल पाहता सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया समोर येतात. ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती, त्यांना धडा मिळाला आहे, असंही कंगनाने यावेळी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीने विजयाचा गुलाल उधळला. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने निवडणुकांच्या परीक्षांमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटने कामगिरी केल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीचं आव्हान अवघ्या दुहेरी अंकांवरच शमलं.
कंगनाने काय म्हटलं?
कंगनाने निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'जे महिलांना सन्मान करत नाहीत, ते दैत्य असतात. जे सन्मान करतात ते देव असतात.. याच निकषांवर आपण देव आणि दैत्य कोण हे ओळखतो.. महिलांचा सन्मान, त्यांना 33 टक्के आरक्षण किंवा इतर काही योजना असोत, त्या अगदी चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जे दैत्यांचं होतं, तेच या सगळ्या विरोधकांचं झालं आहे. दैत्यांचा पराभव झाला. महाभारतात सगळे एकाच कुटुंबातले होते, पण कौरव हरलेच की, तसंच काहीसं महाराष्ट्रात घडलं.'
पुढे बोलताना कंगना म्हटलं की, 'माझं घर ज्यांनी तोडलं त्यांना त्यांची फळं मिळाली आहे. दैत्यांचा पराभव झालाय. माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले, शिवीगाळ करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली होती, त्यांना धडा मिळाला आहे.'
ही बातमी वाचा :
शेवटी शिक्कामोर्तब झालं! रश्मिका-विजय एकमेकांच्या प्रेमात? डेटिंगच्या नव्या फोटोने चर्चेला उधाण