Kangana Ranaut On Gutter Generation Statement: नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकार (Malfunctions In Education System) यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या (Union Education Minister) राजीनाम्याची मागणी करत, कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) नेतृत्त्वात दिल्लीतील (Delhi News) जंतर मंतरवर (Jantar Mantar) विद्यार्थ्यांनी आंदोलन (Student Protest) केलं आणि सरकारला झुकवलं. विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यापासूनच भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिनं 'जेन झेड'वर (Gen Z) टीका करायला सुरुवात केली. आंदोलन संपून कित्येक दिवसांनंतरही कंगनाचं जेन-झींना बोल लावणं सुरूच आहे.
आंदोलन संपल्यानंतर कंगनानं आपल्या सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत 'जन झेड'चं (Gen Z) वर्णन 'गटार जनरेशन' म्हणून केलेलं. अशातच आता कंगनानं आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पण, यावेळीही तिनं माघार वैगरे घेतलेली नाही. उलट आपलं म्हणणं कसं योग्य आहे, हे तिनं उदाहरणासह समजून सांगितलं आहे.
कंगना रनौतनं सांगितलं की, ती संपूर्ण पिढीला बोललेली नाही, तिनं तरुणांमधील एका विशिष्ट गटाबद्दल भाष्य केलेलं. कंगनाच्या 'गटार जनरेशन' या वक्तव्यावर अनेक सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केलेला. तसेच, एआयएमआयएम (AIMIM) नेते वारिस पठाण आणि काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनीही कंगना रनौतवर टीकास्त्र डागलेलं.
जेन-झींना गटार म्हणणारी कंगना रनौत स्पष्टीकरण देताना काय म्हणाली? (Kangana Ranaut On Gen Z)
लोकसभा खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत ANI वृत्तसंस्थेशी म्हणाली की, "लोक स्वतःला कॉकरोच म्हणवतात आणि आपण म्हणतो की, झुरळं गटारातून बाहेर येतात, यात काय चुकीचं आहे? माझा मुद्दा काय आहे? जर लोक स्वतःला झुरळं म्हणत असतील आणि आपण म्हणतो की, गटार हे त्यांचं घर आहे, तर त्यांना मी बोललेल्याचं वाईट का वाटावं?"
"मी स्वतःला नक्कीच झुरळ मानत नाही. जर कोणी म्हणालं की, मी गटारात राहते, तर मी ते नाकारेन... पण जर कोणी स्वतःला झुरळ म्हणत असेल, तर साहजिकच ते गटारातच राहत असतील, आणि दुसरं कुठे? पण मी सर्व तरुणांबद्दल बोलत होते, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी विशेषतः काही लोकांबद्दल किंवा काही महिलांबद्दल बोलत होते...", असं कंगना रनौत म्हणाली.
कंगनाचं 'गटार जनरेशन' वक्तव्य नेमकं काय?
कंगना रनौतनं जंतर मंतर इथल्या आंदोलनावर बोलताना 'जेन झी'ला लक्ष्य केलेलं. कंगनानं म्हटलेलं की, "जेन झी'च्या आंदोलनाचे व्हिडीओ अत्यंत किळसवाणे आहेत. ज्या प्रकारे ते बोलतात आणि जी भाषा वापरतात... मी माझ्या आयुष्यात इतका विचित्रपणा कधीच पाहिला नाही... मी त्यांना 'जनरेशन गटार' म्हणते. त्यांच्यापैकी काहींकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीच नाही. ते अभ्यासात चांगले नाहीत...तुम्ही स्वतःला झुरळ म्हणता आणि तुम्ही तसेच दिसता आणि वागता... त्यात कोणताही फरक नाही. या रील्सनी मला खूप अस्वस्थ केले आहमुळे मी खूप अवस्थ झाले आहे, मला स्वतःला सावरण्याची आणि डिजिटल डिटॉक्स करण्याची गरज आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
