Kangana Ranaut Dharmendra Prayer Meet : बॉलिवूडचे (Bollywood News) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. देशासह जगभरातील चाहत्यांच्या लाडक्या 'ही-मॅन'नं आपल्या सर्वांचा वयाच्या 89व्या वर्षी निरोप घेतला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यावर उपचार सुरू होते. पण, अखेर त्यांनी या जगाला कायमचं अलविदा म्हटलं आणि अवघी सिनेसृष्टी पोरकी झाली. धर्मेंद्र यांच्या जाण्यानं फक्त देओल कुटुंबीय आणि सिनेसृष्टीवरच दुःखाचा डोंगर कोसळला नाहीतर, चाहतेही दुखात बुडाले. अशातच मुंबईत प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी दिल्लीत हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभा आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक राजकारणी आणि अभिनेते उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत देखील धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आली होती. यावेळी कंगना राणौतने धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देत ती भावनिक झाल्याचे बघायला मिळाले.

Continues below advertisement

Kangana Ranaut : त्यांना पाहून मला नेहमीच गावाच्या मातीचा वास आठवायचा

एएनआय या वृत्तसंस्थेच्या मते, कंगना म्हणाली, "धर्मजी (Actor Dharmendra) माझ्यासारख्याच एका छोट्या गावातून आले होते आणि यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यांना पाहून मला नेहमीच गावाच्या मातीचा वास आठवायचा. ते खूप सरळ आणि साधे होते." त्यानंतर कंगना हेमा मालिनीबद्दल (Hema Malini) बोलली, "हे खूप दुःखद आहे आणि हेमाजींना (Hema Malini) या अवस्थेत पाहून आम्हाला आणखी दुःख होतंय. या दुःखात आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत आणि त्या भाजपचा एक महत्त्वाचा भाग आहेत. संपूर्ण भाजप कुटुंब त्यांच्यासोबत आहे. पंतप्रधान आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. धर्मजी कायम मला म्हणायचे 'कंगना, तू खूप छान काम करत आहेस. तू तुझ्या मुद्द्यांसाठी, तुझ्या हक्कांसाठी खूप चांगले लढतेस' असे ते म्हणत असल्याच्या माझ्या अनेक आठवणी आहेत." असेही कंगना म्हणाली.

Continues below advertisement

धर्मेंद्र यांच्या प्रॉपर्टीवर कुणाचा अधिकार? (Who Has Right To Dharmendra Property?)

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या सहा मुलांचा त्यांच्या मालमत्तेत वाटा आहे. या सहा मुलांपैकी चार मुलं सनी देओल, बॉबी देओल, अजिता देओल आणि विजेता देओल आहेत, तर हेमा मालिनी यांच्यापासून दोन मुली ईशा देओल आणि अहाना देओल आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांच्या पश्च्यात 450 कोटींची मालमत्ता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :