Kamal Kapoor Famous Villain Of Bollywood: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) काही दिग्गज, प्रतिष्ठीत कुटुंब आहेत. त्यापैकीच एक कपूर कुटुंब. अगदी राज कपूर (Raj Kapoor) यांच्यापासून सुरू झालेला वारसा अगदी त्यांच्या नातवंडांपर्यंत कायम आहे. तसं पाहिलं तर कपूर कुटुंब बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि जुन्या कुटुंबांपैकी एक, ज्यांनी इंडस्ट्रीला अनेक मोठे स्टार दिले. पृथ्वीराज कपूर (Prithviraj Kapoor) आणि राज कपूरपासून ते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि रणबीर कपूरपर्यंत (Ranbir Kapoor), या कुटुंबातील अनेक प्रमुख कलाकारांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. 

पण तुम्हाला माहितीय का? जेव्हा जेव्हा कपूर कुटुंबातील सदस्यांची चर्चा होते, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर अगदी देखणे चेहरे येतात. ज्यांनी मुख्य नायक आणि नायिका म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकली. पण तुम्हाला या प्रसिद्ध कुटुंबातील स्टार माहीत आहे का? जो दिसण्यात किंवा अभिनयात कपूर कुटुंबातील कोणत्याही सदस्यापेक्षा कमी नसतानाही त्यानं नायक म्हणून नाही, तर खलनायक म्हणून आपली ओळख निर्माण केली? आपण कमल कपूरबद्दल बोलत आहोत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून नाहीतर खलनायक म्हणून ठसा उमटवला.

इंडस्ट्रीतला देखणा खलनायक

कमल कपूर देखील कपूर कुटुंबाचेच सदस्य. त्यांच्या वडिलांचं नाव बशेश्वरनाथ कपूर होतं, ते पेशावरमधील इम्पीरियल पोलिसांत अधिकारी होते. कमल कपूर आणि पृथ्वीराज कपूर चुलत भाऊ होते. दोघांच्याही आई सख्या बहिणी होत्या. पृथ्वीराज कपूर यांनीच कमल कपूर यांना सिनेसृष्टीत स्वतःला स्थापित करण्यास मदत केली. त्यांनी त्यांना त्यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये संधी दिली. या नात्यामुळे ते राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांचे काका लागायचे. कपूर कुटुंबातील इतर सदस्य स्वतःला नायक म्हणून स्थापित करत असताना, कमल कपूर यांना मात्र खलनायक म्हणून ओळख मिळाली आणि ते त्यांच्या काळातील महान खलनायकांपैकी एक बनले.

500 हून अधिक चित्रपटांमध्ये केलंय काम

कमल कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर पंजाबी आणि गुजराती चित्रपटांमध्येही काम केलंय, त्यांनी स्वतःला इंडस्ट्रीतील सर्वात प्रमुख खलनायकांपैकी एक म्हणून प्रस्थापित केलंय आणि प्रेक्षकांच्या हृदयात यशस्वीरित्या स्थान मिळवलंय. कमल कपूर यांनी इंडस्ट्रीमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली, ज्यामुळे त्यांचा मुलगा कपिलनंही इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कमावण्याचा प्रयत्न केला, पण तो इंडस्ट्रीत फारशी ओळख मिळवू शकला नाही. त्याच्या पदरी निराशाच आली. 

या चित्रपटांमध्ये साकारली खलनायकाची भूमिका

कमल कपूर यांच्या काही संस्मरणीय भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर, अमिताभ बच्चन अभिनीत 'डॉन' (1978) मधील नारंग ही त्यांची सर्वात संस्मरणीय भूमिका होती. 'मर्द'मध्ये जनरल डायरची भूमिका साकारून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. 'पाकीजा', 'दीवार' आणि 'खेल खेल में' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या अभिनयानं प्रेक्षकांना चकित केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

वडिलांचा मृत्यू, आई घरकाम अन् सॅनिटरी पॅड विकायची; बॉलिवूड अभिनेत्याचा खडतर प्रवास