एक्स्प्लोर

Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'

Kamal Haasan On Elon Musk Tweet: इलॉन मस्क यांच्या आरोपांनंतर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. भारताची नियामक चौकट ही पूर्णपणे पारदर्शक आणि भेदभावमुक्त आहे. Starlink च्या बाबतीत पक्षपात केला जात असल्याचा दावा पूर्णपणे निराधार आहे, असे मंत्रालयानं स्पष्ट केलं.

Kamal Haasan On Elon Musk Tweet: दिग्गज अभिनेते कमल हसन (Actor Kamal Haasan) यांनी अमेरिकन बिझनेसमन एलन मस्क (Elon Musk) यांची बोलती बंद केलीय. 71 वर्षांच्या अभिनेत्यानं एलन मस्क यांनी भारताबाबत केलेल्या एका ट्वीटवर सडेतोड उत्तर दिलंय. ज्यामध्ये त्यांनी भारतात स्टारलिंक लायसन्स मिळण्यासाठी होणारा उशीर यावरुन काही प्रश्न उपस्थित केलेले. मस्क यांच्या या ट्वीटवर बोलताना कमल हसन यांनी थेट शब्दांतच एलन मस्क यांना हासडलं.

कमल हासन यांनी स्पष्टपणे नमूद केले की, भारतीय असो वा अमेरिकन, कोणत्याही अब्जाधीशाला राष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार नाही. तसेच, त्यांनी दुर्गम भागांत सॅटेलाइट इंटरनेट पुरवण्याच्या क्षेत्रातील स्पर्धेचं समर्थन केलं आणि त्याच वेळी सेवा परवडण्याजोगी असण्याच्या गरजेवरही भर दिला. याव्यतिरिक्त, त्यांनी अमेरिकेच्या दुटप्पीपणावरही टीका केली, मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करणं आणि दुसरीकडे चिनी इलेक्ट्रिक वाहनांवर (EVs) 100% टॅरिफ लादणं यांमधील विसंगती त्यांनी निदर्शनास आणून दिली. 

इलॉन मस्क यांच्या आरोपांनंतर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलंय. भारताची नियामक चौकट ही पूर्णपणे पारदर्शक आणि भेदभावमुक्त आहे. Starlink च्या बाबतीत पक्षपात केला जात असल्याचा दावा पूर्णपणे निराधार आहे, असे मंत्रालयानं स्पष्ट केलं. 

"कोणत्याही अब्जाधीशाला देशाची पॉलिसी ठरवण्याचा अधिकार नाही..."

एलन मस्क यांच्या वक्तव्यांना चोख प्रत्युत्तर देताना, तामिळनाडूचे राज्यसभा खासदार कमल हासन यांनी ट्विटरवर लिहिलंय की, "मिस्टर मस्क, हे खरं आहे की, कोणत्याही अब्जाधीशानं देशाचं धोरण ठरवू नये, मग तो देश भारत असो वा अमेरिका... भारतानं सॅटेलाइट इंटरनेट क्षेत्रात देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही प्रकारच्या सेवा पुरवठादारांकडून येणाऱ्या स्पर्धेचं स्वागत केलं पाहिजे, विशेषतः अशा पुरवठादारांचे स्वागत केलं जावं, जे दुर्गम भागातील रहिवाशांसाठी सर्वात व्यावहारिक, परवडणारं आणि 'लास्ट-माईल' उपाय देऊ शकतात. कमी दरडोई उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सॅटेलाइट इंटरनेट परवडणारं असणं आवश्यक आहे, कारण उच्च सदस्यता शुल्क आणि उपकरणांचा खर्च यामुळे ही सेवा सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीनं 'डिजिटल दरी' (Digital Divide) साधली पाहिजे, ती वाढवता कामा नये..."

"प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या हितानुसार निर्णय घेत असतं..."

कमल हासन यांनी पुढे म्हटलंय की, "भारत हे ओळखतो की, आपली नेटवर्क्स आणि स्पेक्ट्रम ही केवळ व्यावसायिक मालमत्ता नसून ती एक धोरणात्मक पायाभूत सुविधा आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सुरक्षा उपायांबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या हितानुसार निर्णय घेत असतं. पाश्चात्य देश एका बाजूला मुक्त बाजारपेठेचा पुरस्कार करू शकत नाहीत आणि त्याच वेळी स्वतः मात्र संरक्षणात्मक धोरणं (Protectionism) राबवू शकत नाहीत. ज्याप्रमाणे भारत आपल्या देशांतर्गत उत्पादकांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करतो, त्याचप्रमाणे अमेरिकेनंही आपल्या देशांतर्गत उद्योगांचं रक्षण करण्यासाठी चिनी ईव्हीवर (EVs) 100% शुल्क (Tariff) लादलं होतं. सुरक्षाविषयक चिंतेमुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी 'हुवावे'वर (Huawei) बंदी घातली आहे. केवळ स्वतःच्या अजेंड्यावर आधारित इतरांकडून समान संधीच्या परिस्थितीची मागणी कोणीही करू शकत नाही."

"आम्ही आमचा निर्णय स्वतः घेऊ"

आपल्या देशांतर्गत मुद्द्यांवर भाष्य करताना कमल हासन यांनी स्पष्ट केलं की, भारतीय म्हणून आपण आपल्या देशातील त्रुटींवर आणि ताकदीवर लोकशाही मार्गाने चर्चा करू आणि त्यात सुधारणा करू. भारतनेट योजनेतील त्रुटींचा उल्लेख करत त्यांनी देशातील टेलिकॉम क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीचं कौतुकही केलं, ज्यामुळं भारतात जगातील सर्वात स्वस्त डेटा उपलब्ध आहे. पोस्टचा शेवट करताना हासन यांनी एलम मस्क यांना ठणकावून सांगितलंय की, भारत हा एक लोकशाही असलेला देश आहे, कोणतीही रहिवाशी कॉलनी नाही. आम्ही जगाचं स्वागत करतो, पण भारतीय जनताच स्वतःचं भविष्य ठरवेल, पाश्चिमात्य हितसंबंध, त्यांचे दुटप्पी निकष किंवा भारतीय वा अमेरिकन अब्जाधीश नव्हे!"

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Madhuri Dixit: डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget