Kamaal R Khan Claim About Rajpal Yadav: 'राजपाल यादवकडे 50 कोटींची प्रॉपर्टी, तरीही कर्ज फेडण्यासाठी टाळाटाळ का?'; अभिनेता KRKचा खळबळजनक दावा
Kamaal R Khan Claim About Rajpal Yadav: राजपाल यादव सध्या चर्चेत आले आहे. केआरकेनं सोशल मीडियावर दावा केलाय की, राजपाल यादवकडे सुमारे 50 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Kamaal R Khan Claim About Rajpal Yadav: बॉलिवूडचा (Bollywood News) विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या चेक बाउन्स प्रकरणी (Cheque Bounce Case) तिहार तुरुंगात (Tihar Jail) आहे. अनेक बॉलिवूडकर राजपाल यादवला मदत करण्यासाठी सरसावले आहेत. पण, आता हे प्रकरण दावे आणि प्रतिदाव्यांमुळे गुंतागुंतीचं होत चाललं आहे. अभिनेता कमाल आर खाननं (KRK) सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे वाद आणखी चिघळला आहे.
कमाल आर खानचा मोठा दावा
केआरकेनं राजपाल यादवसंदर्भात एक ट्वीट केलंय. त्यानं लिहिलंय की, हा खटला केवळ राजपाल यादवविरुद्धच नाही तर त्याच्या पत्नीविरुद्धही आहे. जर खटला दोघांविरुद्ध आहे तर, त्याची पत्नी तुरुंगात का नाही? असा प्रश्न त्यानं विचारला आहे. राजपाल यादवकडे सुमारे 50 कोटींची मालमत्ता आहे, तरीही तो कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतोय, असा दावाही केआरकेनं केलाय.

मित्रांनी भरले 1.50 कोटी?
कमल आर. खाननं केलेल्या दाव्यानुसार, त्याच्या एका मित्रानं राजपाल यादवचे हिस्सा 1.5 कोटी रुपये भरले आहेत, त्यामुळे त्यांची पत्नी तुरुंगातून बाहेर आहे. त्यानं असाही दावा केलाय की, राजपालनं अनेक बॉलिवूड कलाकारांकडून कर्ज घेतलं आहे आणि ते परत केले नाहीत. केआरकेनं दावा केला होता की, राजपाल काही काळापूर्वी एका मित्राचे अपार्टमेंट खरेदी करणार होता आणि त्याला ओळखणारे लोक म्हणतात की, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. त्याचा मोठा भाऊही हेच म्हणतोय.
The Case is against #RajpalYadav and his wife. So why his wife is not in jail? Because my friend has paid her share Rs 1.50cr! Even Rajpal has took loan from many Bollywood ppl and not returned. Rajpal was buying an apartment of my friend just few months ago. According to one of…
— KRK (@kamaalrkhan) February 12, 2026
प्रकरण नेमकं काय?
हे प्रकरण 2010 सालचे आहे, जेव्हा राजपाल यादवनं त्याच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या 'आता पता लापता' या चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आणि कर्जाची परतफेड झाली नाही. व्याज आणि दंडासह ही रक्कम सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. राजपाल आणि त्यांच्या पत्नीनं दिलेले एक नाहीतर, अनेक चेक बाउन्स झाले, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल झाले आहेत.
न्यायालयाचा निकाल अन् बॉलिवूडकरांची मदत
2018 मध्ये, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांना अनेक वेळा मुदतवाढ दिली, पण पैसे न भरल्यामुळे त्यांना फेब्रुवारी 2026 मध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले. 5 फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले. या कठीण काळात, सोनू सूद, इंद्रजीत आणि निर्माता इंद्रजीत सिंह यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आर्थिक मदत देण्यासाठी पुढे आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























